Home विदर्भ भरधाव ट्रकने पत्रकाराला उडवले; जागीच ठार, चिखली तालुक्यातील घटना

भरधाव ट्रकने पत्रकाराला उडवले; जागीच ठार, चिखली तालुक्यातील घटना

91
0

राजेंद्र पाटील राऊत

भरधाव ट्रकने पत्रकाराला उडवले; जागीच ठार, चिखली तालुक्यातील घटना

चिखली (ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा ) ः भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत ४० वर्षीय पत्रकाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, १६ जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास चिखली- खामगाव रोडवरील पेठ बसस्थानकाजवळ घडली. जयदेव साहेबराव शेळके (४०, रा. पेठ, ता. चिखली) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. त्यांनी वेगवेगळ्या दैनकात वार्ताहर म्हणून काम केले होते.

जयदेव शेळके रस्ता ओलांडत असताना चिखलीकडून खामगावकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमपी २० बी ८६२२) जबर धडक दिली. यात ते जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रक घटनास्थळावरून पसार झाला. मात्र वेळीच अमडापूर पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी काही मिनिटांत ट्रक व ट्रकचालकाला ताब्यात घेतले. अमडापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

Previous articleसंजीवनी हॉस्पिटल नायगाव येथे सांधेदुखी, संधिवात, मणक्याचे आजार व अस्थिरोग उपचार शिबिर संपन्न, पत्रकारासाठी व कुटुंबासाठी केले मोफत उपचार.
Next articleमुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या दणदणीत विजय.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here