Home नांदेड संजीवनी हॉस्पिटल नायगाव येथे सांधेदुखी, संधिवात, मणक्याचे आजार व अस्थिरोग उपचार शिबिर...

संजीवनी हॉस्पिटल नायगाव येथे सांधेदुखी, संधिवात, मणक्याचे आजार व अस्थिरोग उपचार शिबिर संपन्न, पत्रकारासाठी व कुटुंबासाठी केले मोफत उपचार.

283
0

राजेंद्र पाटील राऊत

संजीवनी हॉस्पिटल नायगाव येथे सांधेदुखी, संधिवात, मणक्याचे आजार व अस्थिरोग उपचार शिबिर संपन्न, पत्रकारासाठी व कुटुंबासाठी केले मोफत उपचार.

नायगांव प्रतिनिधि निळकंठ मोरे पाटील ( युवा मराठा न्युज)
संजीवनी हॉस्पिटल नायगाव येथे रविवारी सांधेदुखी, संधिवात, मणक्याचे आजार व अस्थिरोग उपचार शिबिराचे आयोजन रविवार दिनांक १६ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास नांदेड येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.अवधूत मोरे निर्मल हॉस्पिटल नांदेड यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झाले.
या शिबिरास तालुक्यातील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात शिबिराचा लाभ घेतला. पत्रकारिता करत असताना कुठल्याही वेळेच व वयाच बंधन नसते अश्या परिस्थिती त्या पत्रकार बांधवांच्या कुटुंबावर व स्वतःवर लक्ष देणे दुरापास्त होते हा मुद्दा लक्षात घेऊन संजिवनी हॉस्पिटल, नायगावयांच्या पुढाकारातून पत्रकार बांधवांची व त्यांच्या कुटुंबाची मोफत तपासणी केली गेली. या शिबिरात तालुक्यातील बहुतांश पत्रकार यांनी तपासणी करून घेतली.
या शिबिरात हाडांची ठिसूळता तपासणी,शरीरातील युरिक एसिड तपासणी मोफत , हाडाच्या कर्करोगा संबंधीत माहिती व उपचार, गुडघे, माण, कंबर, पाठदुखी, सूज येणे, मणक्याचे आजार,जुने फ्रॅक्चर, हाडाचा कर्करोग आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ घेतला.
जिल्हा पातळीवरील डॉ. अवधूत मोरे यांनी कमी खर्चात रुग्णाची सेवा करून शिबिर संपन्न केल्यामुळे तालुक्यातील नागरिकामधून व पत्रकारा मधून समाधान व्यक्त केले जात आहे.
एक अभिनव उपक्रम राबवल्या बद्दल मराठी पत्रकार बांधव यांनी डाँ. अवधूत मोरे व संजीवन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा श्री. श्रीराम पाटिल शिंदे गडगेकर, श्री.महेश गायकवाड यांचे आभार मानले. नायगाव तालुक्यातील सर्व नागरिकांच्या व पत्रकार बांधवाच्या आरोग्याच्या काळजी साठी आम्ही कटिबद्ध आहोत तसेच नागरिकांच्या सेवेसाठी दर रविवारी संजीवन हॉस्पिटल येथे भेट देणार असल्याचे विचार डॉ. अवधूत मोरे यांनी यावेळी मत मांडले .

Previous articleवडगांव घेनंद येथे भैरवनाथ यात्रा उत्सव उत्साहात संपन्न
Next articleभरधाव ट्रकने पत्रकाराला उडवले; जागीच ठार, चिखली तालुक्यातील घटना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here