Home नांदेड गॅस सिलेंडरच्या महागाई भडक्यात जनता होरपळली! प्रति टाकीला एक हजार दहा रुपये...

गॅस सिलेंडरच्या महागाई भडक्यात जनता होरपळली! प्रति टाकीला एक हजार दहा रुपये मोजताना नाणी ; जनतेच्या डोळ्यांत येते पाणी !

36
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220501-WA0054.jpg

गॅस सिलेंडरच्या महागाई भडक्यात जनता होरपळली!

प्रति टाकीला एक हजार दहा रुपये मोजताना नाणी ; जनतेच्या डोळ्यांत येते पाणी !

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

सध्याला उन्हाळा चालू असून उन्ह्याच्या तीव्रतेचा पारा 46 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत झळा पोहचलया आहेत. हे मात्र खरे असले तरी त्याहूनही जास्तीच्या झळा सध्याला घरगुती गॅस सिलेंडरच्या बेसुमार दरवाढीमुळे जनतेला सोसावे लागते आहेत . घरगुती गॅस सिलेंडरची किंमत एक हजार दहा ते वीस रुपये इतकी झाल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीबांना आता पूर्वीच्या चुलिकडेच ओळण्याची वेळ आली असून घरगुती गॅस सिलेंडर टाकी खरेदी करताना सामान्य गोरगरीबांच्या डोळ्यात पाणी देताना दिसून येत आहे .

अच्छे दिन चा नारा देणारे मोदी सरकार कुचकामी ठरले असून पेट्रोल डिझेल दरवाढी बरोबरच आता घरगुती गॅस सिलेंडरची किंमत वाढवल्यामुळे गोरगरिबांच्या डोळ्यात अश्रू येताना दिसून येत आहेत. शासन दरबारी शासकीय कामात करोडो अब्ज रुपयांचे घोटाळे करून देश बुडवणाऱ्या नेत्यांनी आता मात्र गोरगरिबांच्या ताटावर पाय देण्याचे काम करीत आहेत. सुरुवातीला एकीकडे देशातील महिलांचा त्रास वाचावा या हेतूने केंद्र सरकार घरोघरी मोफत गॅस वाटपाचा कार्यक्रम राबविला त्यामुळे खरंच मात्र महिलांचा त्रास कमी झाला होता . हेच मोदी सरकार आता त्याच महिलांना गॅस सिलेंडरची दरवाढ करून डोळ्याला पदर लावून लढण्याची वेळ आणली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here