Home बुलढाणा संग्रामपूर महसूल विभाग ॲक्शन मोडवर अवैध्य रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले!

संग्रामपूर महसूल विभाग ॲक्शन मोडवर अवैध्य रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले!

217
0

आशाताई बच्छाव

IMG-20230817-WA0080.jpg

संग्रामपूर महसूल विभाग ॲक्शन मोडवर अवैध्य रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले!

अखेर रेतीमाफीयांचे धाबे दणाणले.

विशेष प्रतिनिधी
ज्ञानेश्वर पाटील दांदळे

संग्रामपूर तालुक्यात नदी नाल्यांना आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात रेतीसाठा उपलब्ध झाला आहे त्यामुळे अवैद्य रेती वाहतूकदारांची चांदी झाल्याचे दिसून येत आहे सर्रास राजरोजपणे अवैध्य रेती वाहतूक तालुकाभर चालू असल्याने या अवैद्य वाहतुकीवर आळा घालण्यासाठी संग्रामपूर चे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांच्या कर्तव्यदक्षणतेमुळे बऱ्यापैकी अवैद्य रेती वाहतूकदारांवर कारवाईचा सपाटा सुरू असल्याचे दिसून येते तर आज दिनांक 17 ऑगस्ट2023 रोजी सकाळी 8 वाजता चे दरम्यान मौजे कवठळ अंतर्गत येणाऱ्या कुंभारखेड शिवारात संतोष रावणचौरे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर विनापरवाना अवैधरित्या रेती वाहतूक करतांना पकडण्यात आले सदर वाहनाचा पंचनामा करून पोलीस स्टेशन तामगाव येथे जमा करण्यात आले असून सदरची कार्यवाही संग्रामपूरचे दबंग तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठळ मंडळ अधिकारी जी.आर.राऊत, पी.एस.नलावडे तलाठी कवठळ भाग 2 , जी.के.चव्हाण तलाठी कवठळ भाग1 तसेच के.के. जगताप तलाठी वरवट खंडेराव यांनी कार्यवाही केली. असून एकंदरीतच तालुक्यातील बऱ्याच नदी नाल्यांना तत्कालीन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या कार्यकाळात रेती माफीयांनी पाडलेले मोठमोठे खड्डे 22 व 23 जुलै2023 च्या आलेल्या अतिवृष्टी महापुराने नदी नाल्याला आलेल्या पुराने पूर्णपणे खड्डे बुजल्या गेले असून मोठ्या प्रमाणात मुबलक रेती उपलब्ध झाली आहे नदी नाल्यातील खड्डे सवान झाले असल्यामुळे तालुक्यात बऱ्याच नदीकाठच्या गावात शेकडोब्रास अवैध्य रेतीचा साठा माफीयांनी जमा करणे चालू असल्याचे बऱ्याच गावातील नागरिकांकडून बोलल्या जात असून ग्राम दक्षता समितीकडून तसेच महसूल व पोलीस प्रशासनाकडून माफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील सुज्ञ नागरिक करीत आहेत.

Previous articleलासलगांवचे डाँ अमोल शेजवळ मुळव्याध,भगंदर रुग्णांसाठी ठरलेत देवदुत!
Next articleसंग्रामपूर तालुक्याला मिळाले अमोल बनसोडेच्या रूपात निवासी तालुका कृषि अधिकारी !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here