Home बुलढाणा संग्रामपूर तालुक्याला मिळाले अमोल बनसोडेच्या रूपात निवासी तालुका कृषि अधिकारी !

संग्रामपूर तालुक्याला मिळाले अमोल बनसोडेच्या रूपात निवासी तालुका कृषि अधिकारी !

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20230817-WA0082.jpg

संग्रामपूर तालुक्याला मिळाले अमोल बनसोडेच्या रूपात निवासी तालुका कृषि अधिकारी !
ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख बुलढाणा

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बुलढाणा जिल्हातील अतिशय दुर्गम व आदिवासी असलेल्या संग्रामपूर तालुक्याला अमोल बनसोडेच्या रूपात गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात पूर्णतः कर्तव्यदक्ष निवासी तालुका कृषि अधिकारी लाभले आहे.वास्तविक पाहता महसूल विभागात निवासी उपजिल्हाधिकारी किंवा निवासी नायब तहसीलदार अशी पदे अस्तित्वात आहेत परंतु कृषि विभागा मध्ये निवासी तालुका कृषि अधिकारी हे मात्र अवलिया आहे. अमोल बनसोडे हे कृषी अधिकारी म्हणून सन 2020 ला कोरोनाच्या महामारीत या तालुक्यात रुजू झाले. पूर्ण काळात सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे व दूध विक्री करिता कार्यालयातून पासेस दिल्या , शेतकऱ्यांच्या बांधावर खते बियाणे पोहचण्यासाठी मोहीम स्वरूपात काम केले, इतकेच काय महसूल विभागाने काढलेल्या आदेशानुसार झोनल अधिकारी म्हणून पातूर्डा मंडळात कार्य बजावले. त्याच दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या बियाणे तक्रारी नुसार वरदान आणि रवी या बोगस बियाणे कंपनीवर कायदेशीर कारवाई करत तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.नंतर अमोल बनसोडे हे या तालुक्यात हळूहळू रुळत गेले. अतिशय कमी कृषि सहाय्यक असताना सुद्धा त्यांनी या तालुक्यात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा ) याला या योजनेला जी मरगळ प्राप्त झाली होती ती त्यांनी दूर सारून या प्रकल्पातुन जवळपास दहा कोटी अनुदान वितरित करून या प्रकल्पाला नवसंजीवनी देण्याचं काम त्यांनी केलं. प्रधानमंत्री पीक विमा योजना असो की अतिवृष्टी असो अमोल बनसोडे हे शेतकऱ्यांनाच्या बांधावर जाणारे या तालुक्यातील पहिलेच अधिकारी. या वर्षीच्या अतिवृष्टीतही त्यांनी आपल्या कर्तव्य दक्षिपणाची चुणूक दाखवून दिली. फक्त कृषि विभागा पुरतं सीमित त्यांनी काम कधीच केले नाही यापुढेही जात त्यांनी तालुक्यातील राष्ट्रीय सेवा योजना विध्यार्थाना मार्गदर्शन करणे, वेगवेगळ्या कॉलेज व शाळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC ) बाबत सविस्तर मार्गदर्शन करणे, रक्तदान शिबिरात हजेरी लावून रक्तदान करणे, शाळेमध्ये वृक्षलागवड करणे, एवढेच काय या पलीकडेही जाऊन त्यांनी गरीब पण होतकरू विध्यार्थी यांची फी स्वतःच्या पगारातून भरणे. असे वेगवेगळे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम त्यांनी या तालुक्यात राबवले. गोपीनाथ मुंडे अपघात विमा असो की शेतकरी आत्महत्या अशा अतिशय सवेंदनशील विषयात बनसोडे तात्काळ त्या ठिकाणी हजर होतात व त्या कुटुंबाला भावनिक आधार देऊन सांत्वन करतात व शासनाची मदत लाभार्थी यांना मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करतात. हा माणूस एवढा सवेंदनशील आहे की या वर्षीचा जो महापूर या तालुक्यात येऊन गेला त्यावेळेस त्यांना शेतकरी संकटात असताना त्यांनी मदतीसाठी व झाल्या नुकसानाबाबत केव्हाही फोन फोन केल्यास त्या नागरिकांच्या फोनला तत्परतेने उचलून त्यांचे समाधान केले एवढेच नाही तर त्यांच्या कार्यालयात सुद्धा लोकप्रतिनिधी असोत या सामान्य नागरिक शेतकरी सर्वांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊन त्यांचे समाधानच केले व नेहमी सहकार्याची भावना ठेवून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून मानसिक दुःख झाले असे त्यांनी बोलून दाखवले. कोणाचे सुख असो की दुःख असो हा अवलिया शक्य होईल तेवढं वेळ काढून हजर राहतो. म्हणूनच की काय जेव्हा त्यांचा गेल्या वर्षी मार्च मध्ये वाढदिवस झाला तेव्हा हजारो लोकांनी त्यांचे वाढदिवसाचे स्टेटस व्हाट्स अँपला ठेवले. ज्या तालुक्यात कोणी सेवा द्यायला तयार नाही जो तो आपला स्वार्थ साधतो. आपले जीवन कसे आरामात काहीही काम न करता शासनाचा पगार फुकट कसा मिळेल किंवा आपल्यावर कोणतेही संकट न येवो या मानसिकतेत नोकरी करणाऱ्यासाठी हा माणूस आदर्श आहे. या अधिकाऱ्याने त्याच्या या साडेतीन वर्षाच्या काळात जास्तीत जास्त आठ ते दहा सुट्या घेतल्या असतील. एवढ स्वतःला झोकून देऊन एखाद्या वैराग्या सारखं कृषिप्रति हा अधिकारी समर्पित आहे.अतिशय साधी राहणी पण उच्च विचार श्रेणी,चेहऱ्यावर सतत स्मित हास्य,कामाप्रति प्रचंड आवड व कष्ट करण्यासाठी शंभर टक्के तयारी असे एकंदरीत त्यांच्या विषयी म्हणता येईल.

बॉक्स

संग्रामपूर तालुक्याला मिळालेल्या कर्तव्यदक्ष कृषी अधिकारी अमोल बनसोडे यांच्याकडे जर एकादे शेतकरी किंवा लोकप्रतिनिधी कृषी विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या बाबत कोणतीही तक्रार असो वेळेत मार्गी लावून तात्काळ आल्या तक्रारीची दखल घेत स्वतः सत्य परिस्थिती जाणून घेतात त्यामुळेच त्यांच्या कार्यालयातील कारभार हा पारदर्शक असल्याचे दिसून येते आणि याच तालुक्यात तहसील कार्यालयात मात्र स्वतः तहसीलदार योगेश्वर टोम्पे हेच मुख्यालयी राहत नाहीत त्यामुळे नागरिकांना कुठलीही समस्या आल्यास फोन सुद्धा घेत नाहीत आणि त्यांच्या कार्यालयात तर बरेच कर्मचारी अधिकारी हे उशिरा येतात व कार्यालयीन वेळे आधीच निघून जातात त्यामुळे नागरिकांचे कामे होत नाहीत एका प्रकारे अर्ध्यापेक्षा जास्त फुकाचा पगार शासना कडून घेतात परंतु तहसीलदार साहेब हे धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसतात .म्हणूनच तहसील कार्यालयाचा कारभार हा पारदर्शक व्हावा यासाठी फक्त सेल्फी काढून चालणार नाही तर त्यासाठी कर्तव्यदक्ष कृषी अधिकारी अमोल बनसोडे यांच्याकडून आत्मसात करणे गरजेचे वाटते.

Previous articleसंग्रामपूर महसूल विभाग ॲक्शन मोडवर अवैध्य रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले!
Next articleजनता विद्यालय नांदुर्डी येथे शालेय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here