• Home
  • जागतिक महिला दिन साजरा ..

जागतिक महिला दिन साजरा ..

Anshuraj patil

IMG-20210309-WA0012.jpg

जागतिक महिला दिन साजरा …
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शंकरनगर :- शंकरनगर येथील नामाकिंत इंग्रजी माध्यमाच्या गोदावरी मनार पब्लिक स्कूल या शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी विद्येची देवता सरस्वती व सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डी.पी.पांडेय म्हणाले की;जागतिक महिला दिवस हा संपूर्ण विश्वात फार मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो.आजच्या दिवशी विविध स्तरावर काम करणाऱ्या महिलाना सन्मानित करण्यात येते.महिलानी आज २१ व्या शतकात आपले नाव केले आहे.मनोरंजन,संगीत,विज्ञान,व राजकारण अस कोणतही क्षेत्र नाही ज्यात स्त्रियांच नाव नाही.सगळीकडे महिला अग्रगण्य आहेत त्याच्या समोर आव्हान आल्यावर त्या आव्हानाना तोंडीस तोंड देऊन योग्य मार्ग काढण्त यशस्वी होतात. समोर जायच हार मानायची नाही हा गुण उपजत त्याच्यात असतो असे गौरऊदगार काढले.याप्रंसगी शाळेतील शिक्षिकाचा व इतर महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment