• Home
  • *पीएमसी बँक पुन्हा सुरू होणार ,* *गृहराज्यमंत्री सतेज पाटील .*

*पीएमसी बँक पुन्हा सुरू होणार ,* *गृहराज्यमंत्री सतेज पाटील .*

*पीएमसी बँक पुन्हा सुरू होणार ,*
*गृहराज्यमंत्री सतेज पाटील .*

*कोल्हापूर (ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

भारतीय रिझर्व्ह बँकचे गर्व्हनर यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक गुन्हे विभाग व इन फोर्समेंट डायरेक्टरेट यांची संयुक्त समिती नेमली आहे. ही समिती एचडीआयएलच्या ज्या मालमत्ता पीएमसी बँकेकडे गहाण आहेत त्यांची विक्री करुन त्या रक्कमेचा भरणा बँकेत करुन पीएमसी बँक लवकर सुरू करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आमदार रवींद्र वायकर यांना पत्राद्वारे दिली आहे. यासाठी समितीकडून मालमत्तेच्या मुल्यांकनाचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार वायकर यांनी पीएमसी बँकेतील घोटाळ्यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
पीएमसी बँकेच्या खातेदारांना होणार त्रास सभागृहाच्या निदर्शनास आणत एचडीआयएलच्या मालमत्तेची विक्री करुन ही बँक पुन्हा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. यावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी वायकर यांना लेखी उत्तर पाठविले आहे. यात एचडीआयएल व तिच्या गृप कंपनीने पीएमसी बँकेचे सुमारे 6121 कोटी रक्कमेचे कर्ज थकविले आहे. एचडीआयएलची पीएमसी बँकेकडे गहाण असलेली स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. तसेच राकेश व सारंग वाधवान यांचा अलिबागचा बंगला, जॉय थॉमस यांच्या पत्नीच्या नावे असलेला पुण्यातील फ्लॅट तसेच आरोपी वरियाम सिंग यांची अमृतसर येथील हॉटेल ही फ्रीज केल्याची माहिती या पत्रात त्यांनी दिली आहे. न्यायालयाने एचडीआयएलच्या मालकीचे 2 ऐरोप्लेन व एम प्रवासी हाजच्या लिलावाची संमती दिल्याची माहिती पाटील यांनी दिली.

anews Banner

Leave A Comment