Home Breaking News राजधानी दिल्ली पुन्हा एकदा एका हत्येच्या घटनेने हादरली

राजधानी दिल्ली पुन्हा एकदा एका हत्येच्या घटनेने हादरली

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20230529-WA0075.jpg

राजधानी दिल्ली पुन्हा एकदा एका हत्येच्या घटनेने हादरली

नवी दिल्ली : ( विजय पवार प्रतिनिधी )
राजधानी दिल्लीत एक हादरवणारी घटना घडली आहे. शाहाबाद डेअरी परिसरात रविवारी रात्री एका अल्पवयीन मुलीची चाकूने भोसकून अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. एक-दोन नव्हे, साहिलने साक्षी नावाच्या तरुणीवर २१ वेळा चाकूने वार केले. साहिलने साक्षीवर एकामागून एक अनेक वार केले आणि नंतर तिला दगडाने ठेचले. ज्या वेळी साहिल साक्षीला मारत होता, त्यावेळी बरेच लोक तिथे उपस्थित होते पण कोणीही तिली वाचवू शकले नाही. याउलट लोक ही सारी घटना पाहत राहिले.पोलिसांनी साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक केली आहे.
साक्षीच्या आईचा आक्रोश पाहून अंगावर काटा उभा राहिल. साक्षीच्या आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीयेत. साहिलला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Previous articleआ शंकरराव गडाखांच्या संपर्क कार्यालयातुन जनसमान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार. ह भ प. पंढरीनाथ महाराज तांदळे
Next articleअपघात संदर्भातील एमएलसी आता जवळच्या कोणत्याही पोलीस स्टेशनला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here