Home Breaking News 🛑 SBI ने बदलला ‘हा’ नियम; ग्राहकांना कर्जासाठी फायदा होणार 🛑

🛑 SBI ने बदलला ‘हा’ नियम; ग्राहकांना कर्जासाठी फायदा होणार 🛑

59
0

🛑 SBI ने बदलला ‘हा’ नियम; ग्राहकांना कर्जासाठी फायदा होणार 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 6 सप्टेंबर : ⭕ कोरोना काळात अगदी सर्वसामान्य नागरिकांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. असे असतानाच बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसबीआयनं किरकोळ कर्जासाठी असलेला व्याजदराचा कालावधी (MCLR) रीसेट फ्रीक्वेंसीला एक वर्षांवरून हटवून सहा महिने केला आहे. याचा फायदा एसबीआयच्या गृह कर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कारणासाठी कर्ज घेत असलेल्या ग्राहकांना होणार आहे.

एसबीआयनं ट्विटरवरून याबाबच माहिती दिली आहे. आता ग्राहक १ वर्ष वाट न पाहताही कमी व्याजदराचा फायदा घेऊ शकतील. एसबीआयने एमसीएलआर रीसेट फ्रीक्वेंसीचा कालावधी ६ महिन्यांचा केलाआहे. आधी ग्राहकांना व्याजदर कमी होण्यासाठी १ वर्ष वाट पाहावी लागत होती.

➡️ एमसीएलआर म्हणजे काय :-

बँकिंग क्षेत्रात नियामक आणि रिजर्व बँकेनं १ अप्रिल २०१६ पासून देशात मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग यांच्या आधारावर एमसीएलआर ची सुरूवात केली होती. याआधी बँकेच्या दरावरून व्याज दर ठरवला जात होता.

➡️ मेट्रो शहरांमध्ये ATM मधून महिन्याला 8 वेळा पैसे काढण्याची मुभा :-

स्टेट बँक मेट्रो शहरांमध्ये एका ATM कार्डाद्वारे महिन्याला ८ वेळा विनाशुल्क पैसे काढण्याची मुभा देते. याचाच अर्थ जर तुम्ही मेट्रो शहरात राहत असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क न आकारता ८ वेळा पैसे काढता येणार आहेत. मात्र, यानंतर केल्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रान्झेक्शनवर तुम्हाला शुल्क आकारले जाणार आहे.

➡️ छोट्या शहरांतील SBI ग्राहकांना एटीएममधून 10 वेळा पैसे काढता येणार :-

याशिवाय गैर मेट्रो शहरांमध्ये SBI चे खातेधारक 10 वेळा एटीएममधून विनाशुल्क पैसे काढू शकतात. यामध्ये 5 वेळा SBI ATM मधून आणि 5 वेळा अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. ही लिमिट संपल्यानंतर बँक तुमच्याकडून 10 रुपये ते 20 रुपये शुल्क वसूल करू शकते.

➡️ 10000 रुपयांपेक्षा अधिक पैसे काढताना OTP पाठवला जाणार :-

याशिवाय खातेधारकाला एटीएममधून 10000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढायची असेल तर त्याला त्याच्या मोबाईलवर ओटीपी (OTP) पाठवला जाईल. तो ओटीपी पुन्हा एटीएममध्ये टाकून पैसे काढता येणार आहेत. ही ओटीपीची सुविधा रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएमधून पैसे काढत असाल तर ओटीपी पाठविला जाणार नाही.⭕

Previous article*रेल्वेत लवकरच एक लाख चाळीस हजार रिक्तपदांसाठी परिक्षा .*
Next article🛑 JEE आणि NEET च्या परीक्षा होणारच… 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here