• Home
  • 🛑 JEE आणि NEET च्या परीक्षा होणारच… 🛑

🛑 JEE आणि NEET च्या परीक्षा होणारच… 🛑

🛑 JEE आणि NEET च्या परीक्षा होणारच… 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 6 सप्टेंबर : ⭕ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे JEE आणि NEET ची परीक्षा घेऊ नये अशी मागणी देशातील 6 राज्यांनी सर्वोच्च न्यायालायाकडे केली होती. मात्र न्यायालयाने परीक्षाची याचिका फेटाळून काढली आहे. त्यामुळे परीक्षा रोखण्याचा हा शेवटचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

याआधीच सर्वोच्च न्यायालयाने परिक्षा घेण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर त्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी राज्यांतर्फे करण्यात आली होती. महाराष्ट्र, पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यांनी परीक्षा संदर्भात याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांच्या खंडपीठाने 17 ऑगस्टलाच परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते. मात्र देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी याचिका 6 राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र न्यायालाय आपल्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाला ठाम असल्याचं स्पष्ट आहे.दरम्यान, येत्या 1 ते 6 सप्टेंबर 2020 दरम्यान जेईईची तर 13 सप्टेंबरला नीटची परीक्षा होत आहे.⭕

anews Banner

Leave A Comment