Home Breaking News 🛑 सीईटीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची शेवटची संधी 🛑

🛑 सीईटीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची शेवटची संधी 🛑

116
0

🛑 सीईटीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची शेवटची संधी
🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 6 सप्टेंबर : ⭕ सीईटीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ७ सप्टेंबर ते ८ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सीईटीची परीक्षा १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सीईटी सेल प्रशासन नियोजनसाठी लागले आहे.

२०२०-२१ साठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने सीईटी करिता अर्ज भरला होता. पण फी भरावयाची राहिली होती किंवा जे विद्यार्थी दिलेल्या कालावधीत अर्ज भरू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सीईटी सेलकडून १२ अभ्यासक्रमाच्या साईटीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रियेची मुदतवाढ करण्यात आली आहे. यामध्ये तंत्र शिक्षण विभागाच्या ४ अभ्यासक्रमासाठी आणि उच्च शिक्षण विभागाच्या ८ अभ्यासक्रमांसाठी ही संधी उपलब्ध असणार आहे. महत्वाचे म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही शेवटची संधी देण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला असेल तर त्यांना पुन्हा अर्जातील माहितीत बदल करता येणार नाही. परीक्षा केंद्र बदल करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आधी अर्ज भरला असले, ते विद्यार्थी नवीन अर्ज भरू शकतात. परंतु त्यांनी आधी भरलेल्या अर्जाचे शुल्क त्यांना परत मिळणार आहे. तसेच अशा विद्यार्थ्यांचे परीक्षेचे प्रवेश पत्र नवीन अर्जाच्या आधार तयार करण्यात येईल.⭕

Previous article🛑 JEE आणि NEET च्या परीक्षा होणारच… 🛑
Next article🛑 एक तासात 50 गुणांची परीक्षा 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here