Home माझं गाव माझं गा-हाणं एकाच कुठूंबातील सहा मुली पोलिस सेवेत

एकाच कुठूंबातील सहा मुली पोलिस सेवेत

94
0

Anshuraj patil

एकाच कुठूंबातील सहा मुली पोलिस सेवेत

कोल्हापुर : पन्हाळा तालुक्यातील एक असे कुटुंब आहे ज्यांच्या घरातील एक दोन नव्हे तर चक्क सहा मुली पोलीस खात्यात सेवा बजावत आहेत. एकाच घरातील सहा मुली पोलीस असणारे राज्यातील किंबहुना देशातील पहिलेच कुटुंब असावे. कोण आहेत या सहा महिला पोलीस आणि कशा पद्धतीने त्यांना पोलीस बनण्याची प्रेरणा मिळाली.
कोल्हापुरातल्या भोसले कुटुंबातील सहा मुली पोलीस झाल्या आहेत.
पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावात असलेल्या खोतवाडीमध्ये सुरेश रंगराव भोसले, चंद्रकांत रंगराव भोसले आणि प्रकाश रंगराव भोसले हे तिघे भाऊ राहतात. सुरेश भोसले यांना 4 मुली आणि 2 मुले तर, चंद्रकांत भोसले यांना तीन मुली आहेत. प्रकाश भोसले गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहरात वास्तव्यास आहेत. मात्र, सुरेश भोसले आणि चंद्रकांत भोसले गावातच राहतात आणि शेती करतात. त्या दोघाही भावांच्या एका पाठोपाठ एक अशा सहा मुली पोलीस खात्यात दाखल झाल्या आहेत. सध्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्या कर्तव्य बजावत आहेत.
सुरेश भोसले यांना 4 मुली आणि 2 मुले आहेत. त्यातील सारिका भोसले, सुवर्णा भोसले आणि सुजाता भोसले या तिघी पोलीस झाल्या आहेत. त्यांचा लहान भाऊ सोमनाथ भोसले सुद्धा आता भरतीसाठी प्रयत्न करत आहे. तर, चंद्रकांत भोसले यांना तीनही मुलीच आहेत. त्या तीनही मुली पोलीस खात्यात आपली सेवा बजावत आहेत. रुपाली, सोनाली, सर्वात लहान विमल भोसले या तिघी पोलीस झाल्या आहेत. यामध्ये सर्वात अगोदर सुवर्णा भोसले आणि सोनाली भोसले एकाचवेळी 2008मध्ये पोलीस खात्यात निवड झाली होती.
या सहाही मुली पन्हाळा गडाच्या पायथ्याला असलेल्या खोतवाडीच्या रहिवासी आहेत. त्यांना प्राथमिक शिक्षण वाडीमध्ये मिळाले मात्र, माध्यमिक शिक्षणासाठी वाघवे गावात जावे लागे. त्यासाठी त्यांना दोन किलोमीटर पेक्षा अधिक अंतर पार करून शेताच्या बांधावरून शाळेला जावे लागे. पावसाळ्यात कधी-कधी गुडघाभर चिखलातून प्रवास करत या सहाही जणींनी आपले शिक्षण पूर्ण केले.
6 पैकी 5 आहेत विवाहित –
सारिका भोसले, सुवर्णा भोसले, सुजाता भोसले, रुपाली भोसले, सोनाली भोसले, विमल भोसले या सहापैकी पाच जणींची लग्नं झाली आहेत. सुजाता भोसले यांचे लग्न अद्याप बाकी आहे. विशेष म्हणजे लग्न होऊन सुद्धा सर्व बहिणी भोसले हेच आडनाव लावतात. यामध्ये सारिका भोसले यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात पोस्टिंग आहे. सुवर्णा भोसले कोल्हापुरातल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात, सुजाता भोसले अलिबाग-रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात, रुपाली भोसले नाशिक शहर पोलीस, सोनाली भोसले राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर आणि विमल भोसले यांची कोल्हापूर वाहतूक शाखा येथे पोस्टिंग आहे.
सोयीसुविधांपासून लांब असलेल्या आणि शे-सव्वाशे लोकसंख्येच्या वाडीमध्ये असून सुद्धा आजोबा रंगराव भोसले यांना आपल्या नाती शिकून मोठ्या होणारच असा विश्वास होता. त्यादृष्टीने त्यांनी पहिल्यापासून मुलींना ‘काहीही करून शिका आणि स्वतःच्या पायावर उभे रहा’, अशी शिकवण दिली. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना पायपीट करून जावे लागत होते. तरीही त्यांनी निर्धाराने शिक्षण बंद केले नाही.
एकाच घरातील सहा मुली जेव्हा पोलीस बनतात तेव्हा नक्कीच ही गोष्ट अभिमानास्पद आणि आश्चर्यकारक आहे. म्हणूनच गावासह पंचक्रोशीतील लोकं सुद्धा आता भोसले कुटुंबीयांना भेटून पोलीस भरतीबाबत मार्गदर्शन घेतात. परिसरातील सर्वच मुलींना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
आपल्याला मुली झाल्या म्हणून नाराज व्हायचे कारण नाही. मुलांपेक्षा मुलींना आपल्या आई-वडिलांची अधिक माया असते. त्यामुळे मुलींना पाहिजे तितके शिकू द्या. त्यांना ज्या क्षेत्रात जावे वाटते त्याठिकाणी त्यांना जाऊ द्या. त्यामध्ये त्या नक्की यश मिळवतील, असा विश्वास या सहाही जणींच्या आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleजागतिक महिला दिन साजरा ..
Next articleकोरोना नियंत्रणाबाबत सोलापूर येथे संयुक्त बैठक संपन्न ; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन जिल्ह्यातील 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here