कोरोना नियंत्रणाबाबत सोलापूर येथे संयुक्त बैठक संपन्न ; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन जिल्ह्यातील
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
जिल्ह्यात कोरोना नियंत्रणसाठी प्रत्येक गावातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यासाठी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी व माझे गाव कोरोना मुक्त गाव ही मोहीम अतिशय प्रभावीपणे राबवावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे यांनी केले . जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये कोरोना नियंत्रणसाठी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी , सर्व तालुका आरोग्य अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे हे बोलत होते.या बैठकीत डॉ.गुंडे म्हणाले जिल्ह्यात माझे गाव कोरोना मुक्त गाव ही मोहीम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य व शिक्षण या विभागांनी संयुक्तपणे अतिशय चांगल्या पद्धतीने राबवावी . तालुकास्तरावरील खाजगी डॉक्टर व औषधे विक्रेत्यांची बैठक घेण्यात यावी व त्यामध्ये त्यांना लसीकरण कोविड प्रतिबंध करण्याबद्दल सुचना द्यावी व दुकानदार , दूधवाले , भाजीवाले या सर्वांचे कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तालुकास्तरावर टास्क फोर्सची समिती स्थापन करण्यात यावी तसेच प्रत्येक समितीमध्ये तालुक्याचा प्रतिबंधात्मक आढावा घेण्यात यावा अशा सक्त सूचना देण्यात आल्या . सदर मोहीमेमध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेली जबाबदारी वेळेत न पार पाडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी सुचनाहा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्या.
Home Breaking News कोरोना नियंत्रणाबाबत सोलापूर येथे संयुक्त बैठक संपन्न ; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन जिल्ह्यातील