Home पश्चिम महाराष्ट्र बार्शी तालुक्यातील नदीवरील पूल बांधकाम करण्यास १३ कोटी 27 लाख रुपयांचा निधी...

बार्शी तालुक्यातील नदीवरील पूल बांधकाम करण्यास १३ कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर 

105
0

राजेंद्र पाटील राऊत

बार्शी तालुक्यातील नदीवरील पूल बांधकाम करण्यास १३ कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप
बार्शी तालुक्यात मागील दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील गावांना जोडणारे रस्ते व त्या रस्त्यांवर असलेल्या नदीवरील जुने पूल अतिशय धोकादायक व खराब झाले . या खराब झालेल्या पुलांमळे वाहतुकीस अडचण निर्माण होवून या ठिकाणी नागरिकांचे होणारे दळणवळण हे धोकादायक बनले होते . त्यातून मनुष्यहानी होण्याची स्थिती निर्माण झाली होती . तालुक्यातील या परिस्थितीचा विचार
बार्शी तालुक्यातील नदीवरील पूल बांधकाम करण्यास १३ कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर बार्शी तालुक्यात मागील दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील गावांना जोडणारे रस्ते व त्या रस्त्यांवर असलेल्या नदीवरील जुने पूल अतिशय धोकादायक व खराब झाले . या खराब झालेल्या पुलांमळे वाहतुकीस अडचण निर्माण होवून या ठिकाणी नागरिकांचे होणारे दळणवळण हे धोकादायक बनले होते . त्यातून मनुष्यहानी होण्याची स्थिती निर्माण झाली होती . तालुक्यातील या परिस्थितीचा विचार
करून आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री मा . उद्धवजी ठाकरे साहेब , उपमुख्यमंत्री मा . अजित दादा पवार व ग्रामविकास मंत्री मा . हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे पत्रव्यवहार करून तालुक्यातील धोकादायक बनलेल्या नदीवरील पूल बांधकाम करण्यासाठी जवळपास अंदाजित रक्कम 14 कोटी रुपयांची मागणी केली होती . नदीवरील पुलांची नावे व मागणी केलेली अंदाजित रक्कम पुढील प्रमाणे -1 ) खामगाव ते यळंब रस्त्यावरील नीलकंठा नदीवर नवीन पूल बांधणेकरीता अंदाजित
रक्कम 2. 50 कोटी रुपये .  2 ) वैराग ते धामणगाव रस्त्यावरील नागझरी नदीवर नवीन पूल बांधणे करिता अंदाजित रक्कम 3.80 कोटी रूपये .  3 ) घाणेगाव ते साकत रस्त्यावरील नीलकंठा नदीवर नवीन पूल बांधणे अंदाजित रक्कम 2 . 50 कोटी रुपये .  4 ) घाणेगाव ते साकत रस्त्यावरील भोगावती नदीवर नवीन पूल बांधणे अंदाजित रक्कम 2.50 कोटी रुपये . ) कापसी ते सावरगाव या रस्त्यावरील खडकी नाला येथे नवीन पूल बांधणे अंदाजित रक्कम 2.10 कोटी रुपये .  वरील मागणी प्रमाणे निधी मिळविण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला . या पाठपुराव्याला यश येऊन महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ए.डी.बी. टप्पा 2 अंतर्गत तालुक्यातील वरील कामांना प्रशासकीय मान्यता मिळून 13 कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे . बार्शी तालुक्यासाठी मिळालेल्या या कापसी ते सावरगाव या रस्त्यावरील खडकी नाला येथे नवीन पूल बांधणे अंदाजित रक्कम 2.10 कोटी रुपये . वरील मागणी प्रमाणे निधी मिळविण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला . या पाठपुराव्याला यश येऊन महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ए.डी.बी. टप्पा 2 अंतर्गत तालुक्यातील वरील कामांना प्रशासकीय मान्यता मिळून 13 कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Previous articleमुखेड तालुक्यातील मौजे मेथी शिवारातील शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक..
Next articleप्रहार जनशक्ती वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here