• Home
  • मुखेड तालुक्यातील मौजे मेथी शिवारातील शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक..

मुखेड तालुक्यातील मौजे मेथी शिवारातील शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210227-WA0086.jpg

मुखेड तालुक्यातील मौजे मेथी शिवारातील शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मुखेड तालुक्यातील मौजे मेथी येथील गट क्रमांक 190 मधील 2 हेक्टर13 आर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला असून शेतकरी अहिल्याबाई गणेश हिवराळे, पंचफुलाबाई दत्‍तराम हिवराळे, सुशिलाबाई नीळकंठ हिवराळे यांच्या शेतात ऊस पिकाची लागवड करण्यात आली होती. या शेतात वीज वाहिनीची डीपी असून वीज वाहिनी तील तारा मुळे शॉर्टसर्किट होऊन ऊस पिकास आग लागली. सदरील घटना आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 10 वाजेच्या दरम्यान घडली आहे. ऊस जळत असून शेतकऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांना दिली असूनतहसीलदार काशिनाथ पाटील यांनी घटनेचा पंचनामा तात्काळ करण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

anews Banner

Leave A Comment