Home नांदेड बोगस बियाणे कुठेही उगवत नाही खा. प्रताप पाटील चिखलीकL

बोगस बियाणे कुठेही उगवत नाही खा. प्रताप पाटील चिखलीकL

214
0

आशाताई बच्छाव

IMG-20230622-WA0049.jpg

बोगस बियाणे कुठेही उगवत नाही
खा. प्रताप पाटील चिखलीक
अंबादास पाटिल पवार
लोहा/प्रतिनिधि
बियाणे अस्सल असेल म्हणून ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पेरले पण ते बियाणे बोगस निघाले. असे बियाणे कुठेही उगवत नाही त्याला कोणीही थारा देत नाही अशा शब्दात नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शहर व मतदार संघाच्या राजकीय, परिस्थिवर प्रहार केला, नांदेड- लोहा-लातूर रेल्वे मार्गासाठी येत्या अधिवेशनात निधी उपलब्ध होईल असे आश्वासित केले. केंद्रातील भाजपचा सरकारच्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांपूर्ती निमित्ताने लोहा कंधार तालुक्यातील भाजपच्या वतीने लोहा शहरातील लातूर रोडवरील जिजामाता मंगल कार्यालयात भाजपचे महा जनसंपर्क अभियान अंतर्गत व्यापारी, डॉक्टर, वकील, अभियंता, प्राध्यापक यांचे संमेलन बुधवारी दि. २१ रोजी आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी खा. चिखलीकर बोलत होते.
सदरील महा संमेलनासाठी भाजपचे युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपचे नांदेड महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम, प्रदेश कार्यकारणी सदस्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर, जिल्हा सरचिटणीस डॉ. माधवराव उचेगावकर, माजी नगराध्यक्ष व भाजपा शहराध्यक्ष किरण वट्टमवार, तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे उपनगराध्यक्ष दता वाले, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनागराध्यक्ष छत्रपती धुतमल, नगरसेवक करीम शेख, बालाजी खिल्लारे, भास्कर पाटील पवार, अँड. विलास चव्हाण, दिनेश तेललवार, प्रा. डी. एम. पवार, नामदेव कटकमवार, मीडिया प्रमुख राज यादव, दीपक पाटिल कानवटे बंडु पाटिल वडजे सह बहुसंख्य व्यापारी, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित
खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेल्या काम विकासांची माहिती त्यांनी दिली. जिल्यात रस्ते, रेल्वे प्रश्न मार्गी लावता आले. हो नांदेड-लोहा लातूर रेल्वे मार्गासाठी पावसाळी अधिवेशनात निधी उपलब्ध होईल. असे सांगून आम्हीच रेल्वे मार्ग मंजूर केला अशी वल्गना करणाऱ्यावर सडकून टिका केली. विद्यमान आमदारांच्या कार्यपध्दतीवर आपल्या खास शैलीत त्यांनी टीका केली लोकांचा पूर्णतः अपेक्षाभंग कसा झाला हे सांगताना लोहा शहरासाठी ७० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली पण आता काही जण आम्हीच मंजूर केली म्हणून बॅनर लावतील. परंतु हे सगळं जनतेला समजतंय की कोण विकास करू शकतो. आपण नेहमीच माझ्यावर आणि चिखलीकर कुटुंबियांवर प्रेम केले आहे. आमच्या शब्दाखातीर तुम्ही निवडून दिलेले ‘बियाणे’ बोगस निघाले. अशा बियाणाला कोणीच घेत नाही. बोगस बियाणे बाजूला सारून . झालेली चूक येत्या निवडणुकीत सुधारूया अशा शब्दात आमदार आणि नगराध्यक्ष यांचा नामोल्लेख टाळत त्यांना फटकारले. तसेच शहराच्या विकास कामांना आणखी निधी उपलब्ध करू. असे ग्वाही खा. चिखलीकर यांनी दिली. प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष किरण वद्‌मवार यांनी केले सुन्नसंचलन विक्रम कदम यांनी केले.

Previous articleशिवसेना वर्धापन दिनी तिवसा तालुकाध्यक्ष यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
Next articleकिनवट गो-रक्षक हल्ला व हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या , हिंदू संघटणे कडून मागणी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here