Home अमरावती शिवसेना वर्धापन दिनी तिवसा तालुकाध्यक्ष यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

शिवसेना वर्धापन दिनी तिवसा तालुकाध्यक्ष यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

135
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230622-205352_WhatsApp.jpg

शिवसेना वर्धापन दिनी तिवसा तालुकाध्यक्ष यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा
पी.एन. देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
शिवसेनेच्या (शिंदे गट)वर्धापण दिनाला मुंबई येथे दिलेल्या हृदयविकाराच्या विविध हत्याने निधन झाल्याची बातमी दुर्दैवी घटना मंगळवारी झाल्याचे रात्री उघड झाली. धीरज अंबादास राजुरकर ( वय ३१) नाव असून अमरावती जिल्हातील शेवती येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे शिवसेना शिंदे गट तिवसा तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवीण्यात आली होती. बाथरूम मधून आंघोळ करून आल्यानंतर सहकार्याची बोलताना अचानक भोवड येऊन पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी शेवटी या मूळ गावात त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले ते अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई , दोन बहिणीसह असा परिवार आहे. एक दिवसाआधी शिवसेनेचा शिवसेना शिंदे गटाच्या मुंबईतील नेस्टो सेंटर मध्ये वर्धमान दीन साजरा झाला. या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते गेले होते. अमरावती जिल्हा प्रमुख शिवसेना (शिंदे गट) अरुण पडोळे यांच्यासह पाच ते सहा कार्यकर्ते मुंबई थांबले होते यामध्ये शिवसेनेचे दिवसा तालुकाप्रमुख धीरज राजूरकर यांचाही समावेश होता. वर्धापन दिनाचा कार्यक्रम आतून सर्व पदाधिकारी मुंबई येथे हॉटेलला परत आले. रात्री च्या वेळेस सर्वांनी आंघोळ केली. धीरज राजूरकर यांनी शेवटी आंघोळ केली आणि बाहेर येऊन सहकाऱ्यांशी गप्पा गोष्टी करत असताना भोवळ येऊन खाली पडले. घटनास्थळी येथे उपस्थित असलेले अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित होते. धीरज राजूरकर यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने जवळ असलेल्या गोकुळदास तेजपाल रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती राजूरकर यांच्या कुटुंबीयांना समजतात शेवती गावासह आज बाजूच्या परिसरात सोकाकळा पसरली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती कळताच त्यांनी तातडीने जीटी रुग्णालयात धाव घेतली. पार्थिवाचे अंतर दर्शन घेऊन त्यांनी धीरज राजूरकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच धीरज यांच्या कुटुंबाला तात्काळ पाच लक्ष रुपयाची आर्थिक मदत जाहीर करून त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी काढतो असे स्पष्ट केले. दरम्यान दुसऱ्या दिवशी धीरज राजूरकर यांचे पार्थिव कुटुंबीयांना सोपविण्यात आले. बुधवारी सकाळी पार्थीव शेवटी येथे पोहोचल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. शेवती येथील स्मशान भूमी धीरज राजूरकर यांच्यावर अंत्यविधी करण्यात आली. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, शिवसेनेच्या दोन्ही गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते पंचकोशातील मित्रपरिवार, समस्त गावकरी उपस्थित होते. धीरज राजूरकर यांची सच्चा शिवसैनिक म्हणून पंचक्रोशीत ओळख होती. स्वतःच्या मेहनतीने वीट भट्टी व्यवसायात त्यांनी मोठे नाव केले होते. आजूबाजूच्या परिसरात मन मिळो व मधुर बोलण्याने प्रत्येकाशी अगदी जवळचे संबंध होते एकाएकी घडलेल्या घटनेवर अनेकांचा विश्वास सुद्धा बसत नव्हता.

Previous articleशिक्षण उपसंचालक कार्यालयातील बडे बाबू’ ट्रॅप’; एसीबीची कारवाई.
Next articleबोगस बियाणे कुठेही उगवत नाही खा. प्रताप पाटील चिखलीकL
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here