आशाताई बच्छाव
शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बडे बाबू’ ट्रॅप’; एसीबीची कारवाई.
दैनिक युवा मराठा वृत्त संकलन.
पी एन देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
वैद्यकीय प्रतिकृतीचे बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात १३ हजार रुपयाची लाच घेताना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक ट्रॅप करण्यात जून रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय स्थिती माध्यमिक विभागातील कक्ष क्रमांक चार मध्ये त्याने लाच स्वीकारली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. रुपेश प्रताप सिंग ठाकूर (३३) असे लाचखोर बडे बाबू च नाव आहे. यातील तक्रारदार हे वाशिम जिल्ह्यातील एक कनिष्ठ महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलावर मुंबई येथे उपचार झाला त्यांनी वडिलांच्या ३.३७ लाख रुपयाचे वैद्यकीय प्रतिकृतीचे बिल मंजुरीसाठी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात टाकले ते मंजूर करण्यासाठी वरिष्ठ लिपिक रुपेश ठाकूर हा १५ हजार रुपये लाच मागत असल्याची तक्रार त्या लिपी त्यांनी अमरावती एसीबी कडे नोंदवली तक्रारीची २१ जून रोजी पडताळणी केली. परताळणी दरम्यान ठाकुर ने बाकीची मागणी करून १३ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली ते निष्पन्न झाले. व लगेचच त्याला त्याच्याच कार्यालयात लाचीची ती रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. व त्याच्याविरुद्ध अमरावती शहर कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश कुमार धंदे व अमोल कडू यांच्या नेतृत्वातील अमलदार नंदकिशोर गुल्हाने आशिष जांबवडे शैलेश कडू चालक पीएसआय सतीश चंद्रकांत जन बंधूंनी केली.






