Home अमरावती खासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते गौरक्षण जवळ दुसऱ्या...

खासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते गौरक्षण जवळ दुसऱ्या अंडर ब्रिजचे भूमिपूजन …..

66
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230622-202814_WhatsApp.jpg

खासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते गौरक्षण जवळ दुसऱ्या अंडर ब्रिजचे भूमिपूजन …..
दैनिक युवा मराठा वृत्तसंकलन

पी.एन. देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.
(धामणगांव रेल्वे, )

धामणगाव व आमचे वृत्तपत्र संकलनातील श्री सचिन भाऊ ठाकूर यांच्या माहितीमाध्यमातून परिसरातील लोकांच्या आवागमनाची मुख्य कोंडी संपली आहे शहरातील महत्वाच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण झाले असून गुरुवारी खासदार व रेल्वे बोर्ड सदस्य रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते गौरक्षण जवळ दुसऱ्या अंडर ब्रिजचे भूमिपूजन तसेच संतोषी माता मंदिर कासारखेड रोड येथे तयार झालेल्या अंडरब्रीजचे लोकार्पण करण्यात आले या महत्त्वपूर्ण समस्येचे निराकरण झाले असल्यामुळे धामणगाव तथा परिसरात खासदार तडस व आमदार  अडसड यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे

धामणगावातील वाहतूक कोंडीची प्रमुख समस्या दूर करण्याकरिता  अंडर ब्रिज लवकरात लवकर मंजूर व्हावे याकरिता तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल व खासदार रामदास तडस यांची भेट आ.प्रताप अडसड यांनी  घेतली  होती त्यावेळी महत्त्वाच्या अश्या ठरलेल्या भेटी दरम्यान गोयल यांनी आमदार अडसड व खासदार तडस यांना धामणगाव येथील प्रमुख समस्या असलेल्या रेल्वे अंडर ब्रिज समस्या कायमस्वरूपी लवकरात लवकर दूर करून देण्याचे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्ती म्हणून केंद्राच्या रेल्वे मंत्रालयाने सध्या आहे त्याच्या बाजूला म्हणजेच गौरक्षण जवळ एक तसेच भडभड्या पुलाजवळ मोठ्या जड वाहनाकरिता दुसरे आणि रेल्वे फाटकावर फूट ओव्हर ब्रिज असे एकूण तीन  ब्रिज मंजूर केले  कासारखेड रस्त्यावरील संतोषी माता मंदिर जवळ कोलकत्ता मुंबई लोहमार्गावर अंडर ब्रिज तयार करण्यात आले असून त्याचे लोकार्पण आणि धामणगाव रेल्वे येथील गौरक्षण संस्थेजवळ दुसऱ्या अंडर ब्रिजचे भूमिपूजन गुरुवारी झाल्याने धामणगाव व परिसरातील सर्वाधिक महत्त्वाच्या समस्येचे निराकरण झाले आहे

कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक रेल्वे सल्लागार समिती सदस्य कमल छांगाणी आभार भाजपा शहराध्यक्ष गिरीष भुतडा यांनी मानलेत

———————————–

प्रताप अडसड यांच्या मागणी चे फलित…तडस धामणगावातील अंडर ब्रिज समस्येबाबत प्रताप अडसड यांनी माझ्याकडे व रेल्वे मंत्री महोदयांकडे सतत पाठपुरावा केला त्यामुळे मी आणि प्रताप दोघांनी मिळून रेल्वेमंत्रीना धामणगावच्या समस्यांचे जाणीव करून देऊन धामणगावकरिता तीन अंडरब्रीज तसेच रेल्वे फाटक वर फुट ओव्हर  ब्रिज मंजूर करून घेतले फलस्वरूप संतोषी माता मंदिर जवळ अंडरब्रिजचे लोकार्पण आणि गौरक्षण जवळ दुसऱ्या अंडर ब्रिज चे आज आम्ही भूमिपूजन करतो आहे धामणगाव शहराच्या या महत्त्वपूर्ण कार्यकर्ता प्रताप अडसड यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे खासदार व रेल्वे बोर्ड सदस्य रामदास तडस या प्रसंगी म्हणाले

———————————————

मी केंद्राच्या रेल्वे मंत्रालयाचा व खासदार तडस यांचा आभारी आहे-अडसड

केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने तसेच आपले खासदार रामदास तडस यांच्याकडे मी मागण्या केल्याप्रमाणे दोन अंडर ब्रिज व सोबतच रेल्वे फाटकाजवळ फूट ओव्हर ब्रिज मंजूर केले तसेच संतोषी माता मंदिर जवळ अंडर ब्रिज करण्यात आले आपल्या धामणगाव तथा परिसरातील लोकांची सर्वात महत्त्वाची कोंडी दूर झाली असून यामुळे वाहतूक सुरळीत होणार आहेत तसेच व्यापारी विद्यार्थी आणि आवागमन करणाऱ्या बंधू-भगिनींना या चार ही मार्गामुळे खूप लाभ होणार असल्यामुळे मी केंद्राच्या रेल्वे मंत्रालयाचे व खासदार तडस यांचे आभार व्यक्त करीत असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here