Home अमरावती एन एच एकच्या डॉक्टर, परिचारिकांचा आंदोलन कायम, त्यांची आंदोलन स्थळीच काळी दिवाळी.

एन एच एकच्या डॉक्टर, परिचारिकांचा आंदोलन कायम, त्यांची आंदोलन स्थळीच काळी दिवाळी.

165

आशाताई बच्छाव

IMG_20231114_123323.jpg

एन एच एकच्या डॉक्टर, परिचारिकांचा आंदोलन कायम, त्यांची आंदोलन स्थळीच काळी दिवाळी.
————-
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
डॉक्टर व परिचारिका एन दिवाळीच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या कायम करण्याचे मागणी करता ठीय्या आंदोलन एकच नारा कायम करा या मागणीसाठी सुरू झालेल्या राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या (एन एच एम) डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचा संघर्ष विसाव्या दिवसात पोहोचला आहे. दिवाळी पर्व असतानाही या कर्मचाऱ्यांनी आपला लढाऊ बाणा कायम ठेवला. घर, कुटुंबापासून दूर राहा त या सर्वांनी आंदोलनास्थळीत काळी दिवाळी साजरी केली. विशेष असे की लक्ष्मीपूजन आणि आजच्या (सोमवार) पाडव्याला ही जिल्हा परिषद समोरील त्यांचा ठिय्या कायम होता. सर्वजण घरोघरी प्रकाश सो साजरा करत असताना एन एच एम या महत्त्वाच्या यंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यावर अक्षरशः रस्त्यावर दिवे आणि चूल पेटवून दिवाळी साजरी करण्याची वेळ ओढवली आहे. गेल्या २५ ऑक्टोंबर पासून हे सर्व कर्मचारी संपावर आहेत. दरम्यान जी आर जारी होईपर्यंत माघार घेणार नाही, असा निर्धार आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केला आहे. लक्ष्मीपूजन च्या पूर्वसंध्येला या कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थळी दिवे लावून प्रतीकात्मक पद्धतीने अन्न तत्पूर्वी नेहमीप्रमाणे दिवसभर त्या ठिकाणी ठीय्या दिला. आंदोलनाचा एक भाग म्हणून गेल्या आठवड्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात डेरा टाकला होता त्यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ३०-३० टक्के या प्रमाणात कायम केले जाणार असून पहिल्या टप्प्यात परिचारिकांच्या नोकऱ्या कायम करू असे आश्वासन दिले होते. परंतु तसा जीआर अद्याप जारी करण्यात आला नाही गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत तसा निर्णय घेतला जाईल, असे अपेक्षित होते. परंतु त्या बैठकीला मंत्री स्वतःच उपस्थित न राहू शकल्यामुळे आंदोलनकर्त्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे अमरावतीसह संपूर्ण राज्यभरातील एन एच एम चे आरोग्य कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला आहे. दरम्यान आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता जिल्हा शर्य चिकित्सक(सी एस) आणि जिल्हा आरोग्य अधिकारी (डईएच ओ) यांनी डॉक्टर्स परिचारिका व कर्मचाऱ्यांना पत्र सूचना केले आहेत. परंतु ही बाब आंदोलनात फूट पाडणारी असल्याने कोणीही त्यास बळी पडू नये, असे आव्हान आंदोलन कर्त्यांत्यांच्या पुढार्‍यांनी केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी-कर्मचारी समायोजन कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष तथा एनएचएम चे जिल्हा लेखा व्यवस्थापक अशोक कोठारी, सचिव डॉ. चैतन्य बुरखंडे, उपाध्यक्ष प्रशांत निर्मळ व रतन भाऊ छापाणी मोहन, सहसचिव पंकज औरंगपुरे, ए एन एम संघटनेच्या प्रीती पवार व मोनाली खांडेकर ,आर बी एस के चे डा. मंगेश भलगे, आर बी एस के चेडाॅ. पल्लवी तारे (वैद्य), अमित देशमुख, व पूर्ती लोखंडे, सी एच ओ संघटनेचे डॉ. अंकुश मानकर, कुष्ठरोग विभागाचे बाळासाहेब ठवळी, क्षयरोग विभागाचे रविराज बोंडे, डॉक्टर सोनाली देशमुख शुभांगी बलवारे सुशांत मोहिते आंदोलने के नेतृत्व करीत आहेत.

Previous articleबलिप्रतिपदा / दिवाळी पाडवा 🛑
Next articleतहसील कार्यालयाला दीपावलीची सुटी असूनही नायब तहसीलदार यांनी दिला उत्पन्नाचा दाखला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.