Home सांस्कृतिक बलिप्रतिपदा / दिवाळी पाडवा 🛑

बलिप्रतिपदा / दिवाळी पाडवा 🛑

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20231114-WA0126.jpg

🛑 बलिप्रतिपदा / दिवाळी पाडवा 🛑

बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळाचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यासाठी वामनाने बळीराजाचे द्वारपाल पद स्विकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा आहे. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो.आपापल्या इच्छेप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे ठरवून या मुहूर्तावर केलेली खरेदी शुभ समजली जाते.

घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहीत दांपत्याची पहिली बलिप्रतिपदा पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. हा पाडवा पती पत्नी नात्यातला गोडवा वाढवतो.

उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते.

_विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले, त्यांचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रमसंवत ही कालगणना सुरू केली. इ. स. पूर्व ५७ पासून ही कालगणना प्रचलित आहे._

सगळ्यांना पाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
════════ ★ आपला शुभचिंतक- प्रशांत बच्छाव उपसंपादक युवा मराठा न्यूज महाराष्ट्र 

Previous articleउसतोड मजुरांची दिवाळी सतीश घाटगेंनी केली गोड : फराळासह मुलांना कपड्यांचे वाटप 
Next articleएन एच एकच्या डॉक्टर, परिचारिकांचा आंदोलन कायम, त्यांची आंदोलन स्थळीच काळी दिवाळी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here