Home जालना उसतोड मजुरांची दिवाळी सतीश घाटगेंनी केली गोड : फराळासह मुलांना कपड्यांचे वाटप 

उसतोड मजुरांची दिवाळी सतीश घाटगेंनी केली गोड : फराळासह मुलांना कपड्यांचे वाटप 

183

आशाताई बच्छाव

IMG_20231114_085109.jpg

उसतोड मजुरांची दिवाळी सतीश घाटगेंनी केली गोड : फराळासह मुलांना कपड्यांचे वाटप
——
अंबड/ जालना,(दिलीप बोंडे)-:  ऊसतोड करणारे कुटुंब दिवाळीसारख्या महत्वाच्या सणालाही घर सोडून ऊसतोडीच्या ठिकाणी आपल्या लहान लेकरांना घेऊन राहतात. दीपावलीच्या या सणाचा आनंद त्यांना आणि त्यांच्या मुलांनाही साजरा करता यावा म्हणून समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन  सतीश घाटगे यांनी रविवारी  ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळ व मुलांना नवीन कपडे वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.
अंबड तालुक्यातील भाडी॔ येथे शेकडो अनेक कुटुंब उसतोडीसाठी आलेले आहे. त्यांच्या  उसाच्या फडावर जाऊन  ऊसतोड  त्यांना दिवाळी फराळ व लहान मुलामुलींना समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी  नवीन कपडे वाटप केले. त्यांच्यासोबत बसून त्यांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.  यावेळी लहान लेकरांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद झळकला. सतीश घाटगे सर्व  गरिबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजू छल्लारे ,नवनाथ डोईफोडे  नासर भाई ,ज्ञानेश्वर डोईफोडे, अर्जुन नखाते,अर्जुन  डोईफोडे,भिमराव बरडे, हारून भाई, विलास डोईफोडे, उध्दव लांडे, रामा डोईफोडे, राजु डोईफोडे,हरीश राठोड,सखाराम पानखडे, शेख जावेद, अर्जुन आनंदे रोहिदास मिसाळ, ज्ञानेश्वर घोडके व आदी उपस्थित होते.

Previous articleआयुष्यमान भारत कार्ड बनण्यासाठी रेशन दुकानात गर्दी. रेशनच्या दुकानात बनताहेत “आयुष्यमान कार्ड:
Next articleबलिप्रतिपदा / दिवाळी पाडवा 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.