Home अमरावती आयुष्यमान भारत कार्ड बनण्यासाठी रेशन दुकानात गर्दी. रेशनच्या दुकानात बनताहेत “आयुष्यमान कार्ड:

आयुष्यमान भारत कार्ड बनण्यासाठी रेशन दुकानात गर्दी. रेशनच्या दुकानात बनताहेत “आयुष्यमान कार्ड:

79
0

आशाताई बच्छाव

IMG_20231114_084732.jpg

आयुष्यमान भारत कार्ड बनण्यासाठी रेशन दुकानात गर्दी. रेशनच्या दुकानात बनताहेत “आयुष्यमान कार्ड:
————-
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक

अमरावती
अमरावती जिल्ह्यातील रेशनच्या दुकानात आता आयुष्यमान भारत कार्ड बनवले जात असून, याद्वारे गरजूंना ५ लाख पर्यंत मोफत उपट्याला ची सुविधा मिळणार आहे कारण रेशन दुकानात आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकातील बहुतेक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दिले जाते.
शासनाच्या निदर्शनानंतर आता आला वेग गरजू नागरिकांना मिळणार आरोग्य सुविधा. जिल्ह्यात आतापर्यंत ५.४४ लाख लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड तयार झाले असून, अजून १२ लाभार्थ्यांचे कार्ड तयार व्हायचे आहे मोठ्या संख्येत लाभार्थ्यांचे अवश्य कार्ड तयार व्हायचे असल्याने शासनाने रोशन दुकानांमध्ये हे तयार करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानंतर आरोग्य विभागाचे कर्मचारी रेशन दुकानात बसून कार्ड तयार करत आहेत ज्यांचे जॉगिंग झाले त्यांचे कार्ड व आयडी आरोग्य विभाग तयार करून देत आहे. लॉगिन साठी तीन रुपये तर आयडी तयार झाल्यानंतर कार्डची प्रिंट काढण्यासाठी ५ रुपये असा एकूण ८ रुपये खर्च लाभार्थ्यांना करावा लागत असून रेशन दुकानदाराला ही रक्कम मिळत आहे. रेशन मिळण्यासाठी आता आयुष्यमान कार्डही गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांना रेशन दुकानात बसून गरजूंचे कार्ड काढण्याचे निर्देश दिले आरोग्य कर्मचारी त्यांचे लॅपटॉप, प्रिंटर घेऊन या लाभार्थ्यांना कार्ड काढले नाही त्यांचे कार्ड काढून देत आहेत. या योजनेचा जनतेंना जास्तीत जास्त लाभ मिळावा हाच शासनाचा हेतू आहे. आयुष्यमान भारत कार्ड हे गरजू व गरीब नागरिकांना हितासाठी असल्यामुळे त्यांची भेट ही रेशन दुकानातच शक्य असल्याचे शासनाला माहित आहे. याबाबत जनजागृती केली आहे परंतु त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा अशी शासनाला वाटत असल्यामुळे त्यांनी यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना रेशन दुकानात बसविले. त्यामुळे आयुष्यमान कार्ड बनवण्याचा कामाला सध्या वेग आला आहे याआधी अपेक्षित यश मिळाले नाही. जिल्ह्यामध्ये पन्नास हुन अधिक रेशन दुकानांमध्ये सोय केलेली आहे. आयुष्यमान भारत कार्ड बांधण्याची सुविधा जिल्ह्यातील ५० वर रेशन दुकान मध्ये केली असून या शहरातील शहरातीलच बहुतांश रेशन दुकानाचा समावेश आहे. काही दुकाने तालुक्याच्या ठिकाणी आहेत. डि .के.वानखडे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी माहिती दिली आहे

Previous articleगुन्हेगारी टोळीचे सदस्य: पुण्याहून पळून आलेले क्राईम युनिट ने पकडले.
Next articleउसतोड मजुरांची दिवाळी सतीश घाटगेंनी केली गोड : फराळासह मुलांना कपड्यांचे वाटप 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here