Home जळगाव मराठा समाजाविषयी अपशब्द वापरून छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ सकल समाजाच्या वतीने...

मराठा समाजाविषयी अपशब्द वापरून छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ सकल समाजाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांचा पुतळा दहन

172
0

आशाताई बच्छाव

IMG_20231120_180943.jpg

मराठा समाजाविषयी अपशब्द वापरून छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ सकल समाजाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांचा पुतळा दहन

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील हे संविधानिक पध्दतीने आरक्षणाचा लढा लढत असताना त्यांच्या वैयक्तिक जीवनावर बोलत मराठा समाजा विषयी अपशब्द वापरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा निषेधार्थ मंत्री छगन भुजबळ यांचा तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणारे विरोधी पक्षनेते विजय वठठीवार यांचा चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि १९ रोजी पुतळा दहन करण्यात आला
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओ बी सी एल्गार सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्या खाण्यापर्यंत बोलून मराठा समाजाला डिवचण्याचे काम केले आहे, छगन भुजबळ यांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याने जेल मध्ये जावे लागल्याने त्यांना जरांगे पाटील यांच्यावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नसून भुजबळांचे वय झाल्यामुळे ते बरळत दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत, बिड येथे आमदाराचे घरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जाळण्यास सांगितली का असे बोलून शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने मराठा समाजात भुजबळ यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे , मराठा आरक्षण देण्यास असमर्थ ठरलेल्या राजकीय नेत्यांना गावबंदी केल्याने सात बारा उतारा मराठ्यांच्या बापाचा आहे का असे बोलून भुजबळ यांनी मराठा समाजा विषयी अपशब्द वापरल्याने त्यांच्या मनात मराठा समाजा विरोधात असलेल्या द्वेष बोलण्यातून दिसून आला, छत्रपती शिवाजी महाराज यांनीच स्वराज्य निर्माण केल आहे हे भुजबळांचे वय झाल्यामुळे ते विसरलेत, मराठा आरक्षणाच्या व मराठा समाजाला आडवे जाल तर मराठे तुमची जिरविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मराठा समाजा विषयी अपशब्द वापरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा निषेधार्थ मंत्री छगन भुजबळ यांचा तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणारे विरोधी पक्षनेते विजय वठठीवार यांचा चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि १९ रोजी सकाळी ११ वाजता पुतळा दहन करण्यात आला.
आंदोलनात गणेश पवार,दिलीप पाटील, प्रा चंद्रकांत ठाकरे,ज्ञानेश्वर शिंदे ,प्रशांत गायकवाड, खुशाल बिडे, तमाल देशमुख, राजेंद्र पाटील, खुशाल मराठे, मुकुंद पाटील ,अविनाश काकडे, मुकुंद पवार ,छोटु अहिरे,पंजाब देशमुख ,किरण आढाव, विनोद जाधव ,चेतन देशमुख, सुदर्शन देशमुख, विजय देशमुख, सचिन गायकवाड ,संदीप पाटील, ईश्वर पवार, राजू शिंदे, सचिन पाटील, प्रदीप मराठे ,बंडू पगार, भाऊसाहेब पाटील ,सचिन पवार ,शरद पवार, सुनील पवार, सुनील गायकवाड,भगवान पवार ,बाळु गायकवाड,दादा पाटील, *पी एन पाटील ,दीपक देशमुख यांच्यासह मराठा बांधव सहभागी झाले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here