Home जळगाव चोरट्यांचे ग्रामीण भागाकडे लक्ष केेंद्रीत गावांमध्ये येणाऱ्या अनोळखी इसमांबाबत सजग राहण्याचे ग्रामीण...

चोरट्यांचे ग्रामीण भागाकडे लक्ष केेंद्रीत गावांमध्ये येणाऱ्या अनोळखी इसमांबाबत सजग राहण्याचे ग्रामीण पोलीसांचे आवाहन

104
0

आशाताई बच्छाव

IMG_20231120_181418.jpg

चोरट्यांचे ग्रामीण भागाकडे लक्ष केेंद्रीत
गावांमध्ये येणाऱ्या अनोळखी इसमांबाबत सजग राहण्याचे ग्रामीण पोलीसांचे आवाहन

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- सध्या ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.चोरी करणाऱ्यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये येणाऱ्या अनोळखी व्यक्तींबाबत सजगता बाळगून काही संशयास्पद वाटल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले आहे.
याबाबत त्यांनी सांगितले की, दि.17 रोजी डामरूण, बोरखेडा खुर्द येथे चार ठिकाणी बंद घरात चोरी झाली असून गावात आलेले इसम हे बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. खेडेगावात आम्ही खोबरे विकण्यासाठी, मसाला विकण्यासाठी आलो आहोत, काहींनी तर या गावात पाहुणे म्हणून आलो आहोत, तसेच आम्ही बँकेतून कर्ज घेतलेल्या लोकांना भेटण्यासाठी आलो असल्याचे काही व्यक्तींनी डामरूण व बोरखेडा खुर्द येथे सांगितले.
त्यामुळे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील गावांच्या पोलीस पाटलांनी आपल्या गावात कोणताही अनोळखी इसम काही सामान विक्री करण्यासाठी आल्यास गावातील नागरीकांनी अशा इसमांची संपूर्ण सखोल चौकशी करून त्यांच्याकडून ओळखपत्र,
आधारकार्ड वगैरे तसेच त्यांच्या सोबत दुचाकी, चारचाकी वाहनांबाबत संपूर्ण माहिती व घ्यावी व त्या इसमांचे मोबाईलच्या कॅमेऱ्यात फोटो काढावे. या इसमांबाबत काही संशय वाटत असल्यास तात्काळ पोलीस पाटील, सरपंच यांना कळवून संबंधीत बीट हवालदार तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवून खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन, चाळीसगाव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here