Home नांदेड देगलुर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कुलदीप जंगम यांची वर्णी

देगलुर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कुलदीप जंगम यांची वर्णी

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20230522-WA0032.jpg

देगलुर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून
कुलदीप जंगम यांची वर्णी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

देगलूर:देगलूर येथील सहाय्यक जिल्हाधिकारीपदी सन २०२० च्या तुकडीचे आयएएस अधिकारी कुलदीप जंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे अप्पर सचिव यांनी ही नियुक्ती केली आहे. कुलदीप जंगम हे सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत
आहेत.
आयएएस अधिकारी असलेल्या सौम्या शर्मा या देगलूरहून सहा महिन्यापूर्वी नागपूर येथे बदलीवर गेल्यानंतर देगलूरचे उपविभागीय अधिकारी पद हे बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांच्याकडे अतिरिक्त पदभार म्हणून देण्यात आले होते. आता देगलूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदी सन २०२० च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असलेले कुलदीप जंगम यांची नियुक्ती झाली आहे. ते मूळचे कर्नूल (आंध्र प्रदेश) जिल्ह्यातील रहिवासी आहेत. देगलूर येथे आयएएस अधिकारी येण्याची परंपरा जंगम यांच्यामुळे कायम राहिली आहे. अत्यंत शिस्तीचे व अवैध धंदे, गौण खनिज माफियांचे कर्दनकाळ अधिकारी म्हणून परिचित असलेले जंगम हे देगलूरमधील प्रशासनाची बिघडलेली घडी कशी बसवतात याकडे लक्ष लागले आहे.

Previous articleशेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा .डॉ. भारती पवार
Next articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत आज कार्यशाळा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here