Home नाशिक शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा .डॉ. भारती पवार

शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा .डॉ. भारती पवार

146

आशाताई बच्छाव

Screenshot_20230522-194641_WhatsApp.jpg

शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा .डॉ. भारती पवार

डॉक्टर किसान ॲपचे उद्घाटन, गुणवंतांचा सन्मान

प्रतिनिधी .प्रवीण अहिरराव. युवा मराठा न्यूज

शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला तर तो नक्कीच फायदेशीर ठरतो ,असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केले, डॉक्टर किसान मोबाईल एप्लीकेशनच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भारती पवार बोलत होत्या.
यावेळी आ. राहुल ढिकले, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, संचालिका साधना जाधव, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक रवींद्र निमसे, माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, प्रा. डॉ. संजय जाधव, नरेश पाटील ,बापूसाहेब शिंदे, दत्ता खेमनर उपस्थित होते. डॉक्टर किसान ॲप शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून, त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. भारती पवार यांनी केले. आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील म्हणाले की, शासन निधी देत असते त्याचा योग्य वापर करता यायला पाहिजे. पाणी स्वच्छता शिक्षण आणि निराधार लोकांना मदत करायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर अवलंबून राहू नये ,असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील दिंडे यांनी प्रास्ताविकाद्वारे ॲप आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमांतर्गत, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी बांधवांचा, तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींचा कृषीभूषण, सहकार, कृषिरत्न, समाज सेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सुनील दिंडे, डॉक्टर किसान रिसर्च इन्स्टिट्यूटचे सह संस्थापक व संचालक सागर पवार ,आणि प्रशांत दिंडे, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सागर पवार यांनी आभार मानले.

Previous articleकांद्याला किमान १८०० रुपये हमीभाव द्यावा-कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी
Next articleदेगलुर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कुलदीप जंगम यांची वर्णी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.