Home नांदेड नांदेड शहरात भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, गोळीबारात व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नांदेड शहरात भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, गोळीबारात व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

154
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220405-WA0100.jpg

नांदेड शहरात भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, गोळीबारात व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

दि.05. 04. 2022.

नांदेड शहरात भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. संजय बियाणी असं मृत व्यावसायिकाचं नाव आहे.
गोळीबारात आधी बियाणी गंभीर जखमी झाले होते.
त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
शहरातील शारदानगर येथील त्यांच्या घरासमोरच

गोळीबार करण्यात आला. सुरुवातीला प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हे गोळीबारात गंभीर जखमी झाले. दोन दुचाकीवर आलेले आरोपी त्यांच्या घराजवळ दबा धरून बसले होते.
साडे अकराच्या सुमारास संजय बियाणी घरी आले. गाडीतून उतरताच त्यांच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेत त्याचा चालक देखील जखमी झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून आणि आरोपीचा शोध सुरू आहे. खंडणीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिवाय घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीसांकडून तपासले जात आहेत.

Previous articleराष्ट्रीय कबड्डी स्वर्धेत शिवा डांगे यांची निवड
Next articleअहेरी नगर पंचायत मार्फत नियमांना डावलून काढण्यात आलेली 1 कोटी 43 लाख रुपयांची घनकचरा व्यवस्थापन निविदा तातडीने रद्द करा..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here