Home गडचिरोली अहेरी नगर पंचायत मार्फत नियमांना डावलून काढण्यात आलेली 1 कोटी 43 लाख...

अहेरी नगर पंचायत मार्फत नियमांना डावलून काढण्यात आलेली 1 कोटी 43 लाख रुपयांची घनकचरा व्यवस्थापन निविदा तातडीने रद्द करा..!!

172

राजेंद्र पाटील राऊत

अहेरी नगर पंचायत मार्फत नियमांना डावलून काढण्यात आलेली 1 कोटी 43 लाख रुपयांची घनकचरा व्यवस्थापन निविदा तातडीने रद्द करा..!!
जिल्हाधिकारी मा.संजय मिना यांना निवेदन देऊन भाजपा नगरसेवकांनी केली मागणी..!!
निविदा प्रक्रियेची तातडीने चौकशी करण्याचे जिल्हाधिकारी साहेबांनी दिले आदेश..!!                                                   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अहेरी नगर पंचायत तर्फे वर्ष 2022-23 ह्या एक वर्षासाठी तब्बल 1 कोटी 43 लक्ष रुपयांची घनकचरा व्यवस्थापन निविदा नुकतीच काढण्यात आली, एका विशिष्ट एजन्सीला हे कंत्राट मिळावे ह्यासाठी ह्या निविदेच्या नियमांत अनेक बदल करण्यात आले, ह्या विरुद्ध अहेरी येतील भाजपा नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत काल गडचिरोली येते जिल्हाधिकारी मा. संजय मीना यांची भेट घेत ह्या निविदा प्रक्रियेबद्दल सविस्तर चर्चा केली, तसेच त्यांना एक निवेदन देत नियमांना डावलून ही निविदा काढण्यात आल्याने ती निविदा तातडीने रद्द करून पारदर्शकपणे नव्याने निविदा प्रकाशित करण्याची मागणी त्यांच्याकडे केली..!!
भाजपा नगरसेवकांनी केलेल्या मागणीला जिल्हाधिकारी मा.संजय मिना यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, ह्या विषय गँबीर असल्याने ह्या निविदा प्रक्रियेची तातडीने चौकशी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला ह्यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी दिल्या, ह्यावर भाजपा नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले..!!
घनकचरा व्यवस्थापनात मोठा भ्रष्टाचार होत असल्याने ही निविदा प्रक्रिया न करता नगर पंचायत अहेरी मार्फत हे व्यवस्थापन केल्यास वर्षाला लाखो रुपयांची निधी वाचेल व ह्यातून सफाई कामगारांचे वेतन वाढविण्याची जोरदार मागणी आकडेवारी सहित अहेरी नगर पंचायतच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी केली होती हे विशेष..!!
जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतांना भाजपा नगरसेवक शालिनी पोहनेकर,अमोल गुडेल्लीवार, विकास उईके,मुकेश नामेवार, संतोष मद्दीवार, संजय पोहनेकर सह अहेरी येतील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती..!!