Home नाशिक नाशिक पदवीधर माघारीच्या अखेरच्या दिवस! अनेकांची माघार

नाशिक पदवीधर माघारीच्या अखेरच्या दिवस! अनेकांची माघार

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20230117-WA0023.jpg

नाशिक पदवीधर माघारीच्या अखेरच्या दिवस! अनेकांची माघार
(भास्कर देवरे, युवा मराठा न्युज)

नाशिक : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकी आज उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे काही उमेदवारांचे परतीचे वारे सुरू झाले असून आज ४ अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता जे आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक काही अंशी सोपस्कार ठरणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागल्यापासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या अनेक घडामोडींमुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार असून नाशिकचे पदवीधर यंदा कोणाला कौल देणार, यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.आज ४ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यात सत्यजित तांबे यांना चुरशीची लढत देणारा एकही उमेदवार नव्हता मात्र अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी ठाकरे गटाचा पाठिंबा मिळवत तांबे यांना थेट आव्हान दिले. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार हे नक्की. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असून त्यात उमेदवार शुभांगी पाटील नॉट रीचेबल आहेत. त्यांचा फोन गेल्या काही वेळापासून बंद येत आहे आहेत.काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असूनही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही व या निवडणुकीतून माघार घेतली. त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल केला. ऐनवेळी झालेला हा गेम पाहून संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. भाजपने आपला कोणताही उमेदवार या निवडणुकीसाठी उभा केलेला नाही व त्यांच्याकडून इच्छुक असलेल्यांना त्यांनी माघारी धाडले. हा सत्यजित तांबे यांना दिलेला छुपा पाठिंबाचा आहे अशी चर्चा सुरू आहे.
त्यातूनच आता भाजपाचे धनंजय जाधव यांनी देखील या निवडणुकीतून माघार घेतली आहे. ते म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याशी बातचीत केल्यानंतर हा निर्णय घेतला. भाजपचे धनंजय जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. पक्ष श्रेष्ठींच्या विनंतीनंतर मी माघार घेत असल्याचा जाधव यांनी खुलासा केला आहे. त्यामुळे यावरून लक्षात येते की भाजपही सत्यजित तांबे यांच्यासाठी रान मोकळे करत आहेत.
तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ सुधीर सुरेश तांबे यांची माघार म्हणजेच काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाशी साम्य असलेले दुसरे डॉ सुधीर तांबे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यांच्यासोबतच अमोल बाबासाहेब खाडे आणि दादासाहेब पवार यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here