Home नाशिक अभिनेत्री ऐश्वर्या रायला सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस

अभिनेत्री ऐश्वर्या रायला सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस

116
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230117-123612_Google.jpg

अभिनेत्री ऐश्वर्या रायला सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस
भास्कर देवरे (युवा मराठा न्यूज) : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. सिन्नरमधील जमिनीचा कर थकवल्या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून सिन्नरच्या तहसीलदारांनी थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी 1200 मालमत्ताधारकांना नोटीस बजावली आहे. त्यात ऐश्वर्या राय-बच्चनला देखील ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे नाशकात ऐश्वर्या रायचे नाव नव्याने चर्चेत आले आहे.
याबाबत अधिकचे वृत्त असे की, ऐश्वर्या यांची सिन्नरच्या ठाणगाव जवळ आडवाडीत जमीन आहे. या भागात ऐश्वर्याची आडवाडीच्या डोंगराळ भागात सुमारे 1 हेक्टर 22 आर जमीन असून या जमिनीचा कर थकला आहे. याच जमिनीच्या एका वर्षाच्या कराचे 22 हजार थकल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. ऐश्वर्या राय सोबत इतरही 1200 मालमत्ता धारकांना नोटीस बजावण्यात आली असून हा आकडा मोठा आहे. थकीत अकृषक कराचा भरणा मोठ्या प्रमाणावर रखडला आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार, मार्च अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. त्यातूनच 1200 मालमत्ताधारकांना तहसीलदारांनी नोटीस बजावली असून वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या 1200 मालमत्ताधारकांमध्ये ऐश्वर्या राय सोबतच अनेक मोठी नावे आहेत. त्यात बिंदू वायू ऊर्जा लिमिटेड, एअर कंट्रोल प्रायव्हेड लिमिडेट, मेटकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिडेट, छोटाभाई जेठाभाई पटेल अँड कंपनी, राजस्थान गम प्रायव्हेट लिमिटेड, एल बी कुंजीर इंजीनिअर, आयटीसी मराठा लिमिटेड, एस. के. शिवराज, हॉटले लीला व्हेंचर लिमिटेड, कुकरेज डेव्हलपेंट कॉर्पोरेशन, रामा हँडिक्राफ्ट, ओपी एंटरप्रायझेस कंपनी गुजरात यांचा देखील समावेश आहे.

Previous articleश्री आदिनाथ साखर कारखान्याचे साखर पोते पूजन शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न
Next articleनाशिक पदवीधर माघारीच्या अखेरच्या दिवस! अनेकांची माघार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here