Home सोलापूर श्री आदिनाथ साखर कारखान्याचे साखर पोते पूजन शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न

श्री आदिनाथ साखर कारखान्याचे साखर पोते पूजन शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230116-WA0018.jpg

श्री आदिनाथ साखर कारखान्याचे साखर पोते पूजन शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न

युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल सोलापूर जिल्हा चीफ biro महादेव घोलप

सोलापूर करमाळा
आदिनाथ सहकार साखर कारखाना लि. सभासदांच्या विश्वासाच्या बळावर सुरळीत चालू झाला असून कारखान्यामधून उत्तम प्रतीचे साखर उत्पादन सुरू झाले आहे, आदिनाथ मध्ये प्रथम उत्पादित साखर पोत्यांचे पूजन आज मकरसंक्रातीच्या पर्वावर रविवारी प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. आदिनाथ साखर कारखाना सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी असताना आदिनाथ सुरू झाला ही करमाळा तालुक्यातील शेतकरी सभासदांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत, शिवाजीराव सावंत, माजी आमदार नारायणआबा पाटील,रश्मीदिदी बागल यांनी बहुमोल सहकार्य केल्यामुळे आम्ही कारखाना चालू करु शकलो अशी माहिती आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी दिली आहे. ज्या शेतक-यांनी आदिनाथ कारखान्याला ऊस गळीतास दिला आहे त्या ऊसाचे पेमेंट व तोडणी वाहतूक तात्काळ देण्यात येत आहे यासाठी जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी आदिनाथला ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. मागील तीन वर्ष आदिनाथ साखर कारखाना बंद असल्याने या हंगामामध्ये कारखाना चालू होणार नाही अशी परिस्थिती असताना तालुक्यातील सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही कारखाना चालू करु शकलो आहोत असे त्यांनी सांगितले. तसेच चालू गळीत हंगामात आम्ही सभासदांना न्याय देण्यास बांधील आहोत असे त्यांनी पुढे म्हटले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मार्गदर्शक संचालीका रश्मी दिदी बागल उपस्थित राहू शकल्या नाहीत यावेळी माजी आमदार नारायणआबा पाटील, तसेच व्हा. चेअरमन रमेश कांबळे,संचालक नितीन जगदाळे, नानासाहेब लोकरे, हरिदास केवारे, पांडुरंग जाधव,नामदेव भोगे, आणि डाॅ. वसंतराव पुंडे, हरिदास डांगे, रामदास झोळ महेश चिवटे, शिवाजी बंडगर सर मकाईचे संचालक संतोष देशमुख,कल्याण सरडे, अर्जुन तकीक व कारखान्याचे कार्यकारी संचालक अरुण बागनवर वर्क्स मॅनेजर प्रल्हाद आटोळे,चिफ केमिस्ट खाडे, चिफ अकौंटंट सतीश पोळ, शेती अधिकारी दिपक खटके, कार्यालय अधिक्षक मधुकर कदम, सिव्हिल इंजिनिअर अभंग, इलेक्ट्रिक इंजीनियर दिपक देशमुख, स्टोअरकीपर शरद काकडे इत्यादी उपस्थित होते.

Previous articleअनसिंग येथे चोरांनी केली कहर एकाच रात्री फोडले तीन घर
Next articleअभिनेत्री ऐश्वर्या रायला सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here