Home वाशिम अनसिंग येथे चोरांनी केली कहर एकाच रात्री फोडले तीन घर

अनसिंग येथे चोरांनी केली कहर एकाच रात्री फोडले तीन घर

123
0

आशाताई बच्छाव

IMG-20230116-WA0019.jpg

अनसिंग येथे चोरांनी केली कहर एकाच रात्री फोडले तीन घर                                                            वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

अनसिंग येथील ओम रामेश्वर गाडेकर यांच्या घराचे कुलूप तोडून रात्री दोन च्या सुमारास घडली ही घटना. सि.सी.टिव्ही फोटोज् मध्ये चोर कैद. घरातील साठ हजार रुपये व काही सोन्याचे दागिने गेले चोरी. ओम व त्याची आई मामा च्या गावी गेले असता त्याच रात्री झाली त्यांच्या घरी चोरी. तसेच पवन रमेश नाळे यांची नवीन गाडी हिरो स्प्लेंडर क्र. MH.37.AE.3514 या क्रमांकाची गाडी रात्री आठ वाजता घरा समोर उभी केली होती. व रात्री जेवण वगैरे करून बाहेर आला असता अकरा वाजता यांची गाडी यांच्या घरासमोर उभी होती.सकाळी सात वाजता झोपेतून उठल्या नंतर त्यांची गाडी घरा समोर नसल्या ने त्यांनी आजू बाजूला शोध घेतला असता मिळून आली नाही. गाडी क्रमांक MH.37.AE.3514 हिरो स्प्लेंडर काळ्या रंगाची किंमत 90 हजार रु ची घरा समोरून अज्ञात चोरट्यांनी रात्री च्या दरम्यान चोरून नेली आहे. तसेच शेख समीर शेख वजीर यांची पण एच एफ डिलक्स क्र.MH.37.Y.2418 या क्रमांकाची गाडी किमंत 40 हजार रु अज्ञात चोरट्यानी अश्या दोन गाड्या व ओम गाडेकर यांच्या घरचे साठ हजार रु असे तिघाचे मिळून 1 लाख 90 हजार रुपयांची चोरी अज्ञात चोरट्याने रात्री दोन च्या सुमारास केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here