Home बुलढाणा पत्रकार ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या तामगाव पोलिसांवर कार्यवाही...

पत्रकार ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या तामगाव पोलिसांवर कार्यवाही करा व दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या.

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20230115-WA0066.jpg

पत्रकार ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या तामगाव पोलिसांवर कार्यवाही करा व दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या.

लोकस्वतंत्र्य पत्रकार महासंघाचे विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र अमरावती यांना निवेदन!

युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर

संग्रामपूर- तालुक्यातील आमच्या लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सभासद संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील एमसीएन न्यूज मराठीचे, युवा मराठा न्यूज चे विशेष प्रतिनिधी व विश्व प्रभातचे प्रतिनिधी पत्रकार श्री ज्ञानेश्वर दांदळे पाटील यांच्यावर तामगाव पोलिसांनी अधिकाराचा दुरुपयोग करीत खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत पोलिसांकडून कायद्याचे उल्लंघन अवैध धंद्यांना संरक्षण आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बातम्या प्रसारित केल्या म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्याकरिता ठाणेदार आणि त्यांच्या काही कर्मचाऱ्यांनी अन्यायकारक असविधानिक कृत्य केलेले आहे. हा अधिकाराचा दुरुपयोग म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना वेठीस धरून अपमानास्पद वागणूक देण्याचे अमानवीय कृत्य आहे पोलिसांनी ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर काही विघ्नसंतोषी लोकांच्या कडून खोट्या तक्रारी घेऊन हे गुन्हे दाखल केले परंतु त्या दर्शविलेल्या घटना क्रमांक च्या वेळेत श्री दांदळे हे घरात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज वरून सिद्ध झालेले आहे परंतु योग्यरीत्या तपास केल्यास व सीसीटीव्ही फुटेज आणि काही साक्ष पुरावे नोंदविल्यास पत्रकार ज्ञानेश्वर पाटील निर्दोष असल्याचे निष्पन्न होईल. परंतु सूटबुद्धीने गुन्हा दाखल केला असल्यामुळे तो कमी व्हावा अशी मानसिकता ठाणेदार यांची दिसत नाही म्हणूनच फुटेज व योग्य ते पुरावे जमा करण्याची कार्यवाही पोलिसांकडून करण्यात आली नाही. ते पुरावे नष्ट होण्यापूर्वी जमा करण्याचे आदेश व्हावेत तथा आमच्या पत्रकारांवर सूटबुद्धीने जाणून-बुजून खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायद्याच्या दुरुपयोगातून दबाव आणण्याचे प्रयत्न करणाऱ्या ठाणेदार आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करावी व त्यांचे वर कायदेशीर कारवाई व्हावी व वेळोवेळी अधिकारांचा गैरवापर करून पत्रकार आणि निरपराधांवर अन्याय करणाऱ्या पोलिसांकडून पोलीस खात्याला बदनाम करण्याचे प्रयत्न होत आहेत तसे धाडस होऊ नये म्हणून ही कारवाई गरजेची आहे त्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र अमरावती यांना दिलेल्या निवेदनावर लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय देशमुख यांची सही असून या आधी सुद्धा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघा कडून पोलीस स्टेशन तामगाव व जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना निवेदन दिलेले आहे. आणि पुन्हा दिनांक 13 जानेवारी २०२३ रोजी सुद्धा ठाणेदार पोलीस स्टेशन तामगाव यांना लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय देशमुख व जिल्हाध्यक्ष श्री स्वप्नील देशमुख यांनी निवेदन दिले आहे परंतु सदरच्या निवेदनाकडे दुर्लक्ष करत आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. तरी लवकरात लवकर तामगाव पोलीस स्टेशन मधील दोशी पोलिसांवर योग्य ती कार्यवाही करून पत्रकार ज्ञानेश्वर पाटील यांच्यावरील गुन्हे मागे न घेतल्यास लवकरच लोकशाही मार्गाने पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल. असा इशारा यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघा कडून देण्यात आला.

Previous articleद श्री अकॅडेमी वरवट बकाल येथे एक अनोखी विज्ञान प्रदर्शनी सोहळा संपन्न
Next articleअनसिंग येथे चोरांनी केली कहर एकाच रात्री फोडले तीन घर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here