Home Breaking News गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामाची चौकशी करा

गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामाची चौकशी करा

253

गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामाची चौकशी करा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांचेकडे मागणी

बांधकाम निकृष्ट होत असल्याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त

मुंबई मंत्रालयात भेटून मंत्र्यांना दिले चौकशी करणेबाबतचे पत्र

दिनांक २ नोव्हेंबर २०२२ गडचिरोली

जिल्हा प्रेक्षागार मैदान गडचिरोली येथे ४४ कोटी रुपयांचे जिल्हा क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्यात येत असून बांधकाम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे असल्याने या बांधकामाची तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्रजी चव्हाण यांची मुंबई मंत्रालयात देऊन केली

राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, वित्तमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या हिताचा निर्णय घेत जिल्हा क्रीडा संकुलाकरिता निधी उपलब्ध करून दिला. परंतु सदर बांधकामास ५ वर्षाचा कालावधी होऊन देखील काम पूर्णत्वास आलेले नाही. ही विचार करण्यायोग्य बाब आहे.

सदर बांधकामामध्ये कंपनी कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. मागील अनेक महिन्यांपासून सदर कामाला निधी उपलब्ध होऊन देखील अतिशय संथ गतीने बांधकाम करण्यात येत आहे. याबाबत वारंवार संबंधितांना सूचना करूनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. करिता सदर बांधकामाची तातडीने चौकशी करून त्यात दोषी असणाऱ्या वर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी या पत्राच्या माध्यमातून मंत्री महोदयांकडे केली आहे.

Previous articleजिरे माळी समाज संघाच्या तालुका अध्यक्षपदी मुकेश साळवे.
Next articleआमचे मार्गदर्शन डॉ.पै.तानाजी (भाऊ)जाधव याच्या वाढदिवसानिमित्त काही सामाजिक कार्यक्रम…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.