Home Breaking News जिरे माळी समाज संघाच्या तालुका अध्यक्षपदी मुकेश साळवे.

जिरे माळी समाज संघाच्या तालुका अध्यक्षपदी मुकेश साळवे.

183

जिरे माळी समाज संघाच्या तालुका अध्यक्षपदी मुकेश साळवे.
सटाणा ( सोमपुर ) किशोर अंकुशे प्रातिनीधी युवा मराठा न्युज नेटवर्क सटाणा
जिरे माळी समाज सेवा संघ अंतर्गत जिल्हा व तालुका शाखांची मुदत संपुष्टात आल्याने नवीन जिल्हा कार्यकारणी संघाचे जेष्ठ कार्यकर्त्यांकडून नियुक्त करण्यात आली आहे. या संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विजय कानडे, सरचिटणीस नारायण नवले, कोष्याध्यक्ष किरण पगारे व सदस्य यांच्या सूचनेचे पालन करत ही कार्यकारणी नियुक्त करण्यात आली आहे. या कार्यकारणीत बागलाण तालुक्याचा सुद्धा समावेश आहे. याच अनुषंगाने बागलाण तालुका अध्यक्षपदी ताहाराबाद येथील रहिवासी व भाजपा शहराध्यक्ष मुकेश साळवे यांची वर्णी लागली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्ष भैरवलाल गवळी, सचिव मनोहर नंदन, कोषाध्यक्ष योगेश नंदन, सदस्य रवी मानकर, विशाल नहीरे, नितीन घरटे, उमेश जाधव, गणेश देशमुख, राहुल सोनवणे, महेश मानकर, विशाल गवळी, महेंद्र पवार, वैभव नहिरे, दीपक महाजन, रोहित गवळी, संदीप नेहिरे, राकेश रायते, शरद नंदन, मिलिंद जाधव, रवींद्र सोनवणे, आदींचा समावेश आहे. या कार्यकरणीच्या निवडीने ताहाराबाद, अंतापुर, जायखेडा, या गावात संबंधित कार्यकर्त्यांचा गावकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा ही देण्यात आल्या आहेत.
संघाने व समाजाने जो माझ्यावर विश्वास दाखवला याचे मी नक्की समाजासाठी इतर लोकांसाठी सोनं करेल. व समाज हितासाठी सतत माझे प्रयत्न सुरू राहतील.
मुकेश साळवे तालुका अध्यक्ष जिरेमाळी समाज सेवा संघ

Previous articleवनकर्मचारी प्रगणना सुरक्षेची हमी द्या वनरक्षक वनपाल संघटनेचे अध्यक्ष यांचा वनविभागाला इशारा
Next articleगडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामाची चौकशी करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.