Home Breaking News वनकर्मचारी प्रगणना सुरक्षेची हमी द्या वनरक्षक वनपाल संघटनेचे अध्यक्ष यांचा वनविभागाला...

वनकर्मचारी प्रगणना सुरक्षेची हमी द्या वनरक्षक वनपाल संघटनेचे अध्यक्ष यांचा वनविभागाला इशारा

119

वनकर्मचारी प्रगणना सुरक्षेची हमी द्या

वनरक्षक वनपाल संघटनेचे अध्यक्ष यांचा वनविभागाला इशारा

संपूर्ण महाराष्ट्रातील वन्यजिव विभाग ,वन विभाग मार्फत दिनांक ०१.११.२०२२ ते ०६.११.२०२२ पर्यंत वन्यजीव ब व्याघ्रगणना करणे सबंधी एन.टी.सि.ए चे आदेश प्राप्त आहेत. सद्यास्थितित संपूर्ण जंगलात उंच गवत वाढलेले आहे. यावर्षी झालेल्या प्रचंड पावसामुळे जंगलात मोठ्या प्रमाणात गवत व नॆसर्गिक झाडोरा वाढला असल्यामुळे, जंगलात गस्त करणे सुद्धा धोकादायक आहे अशातच सकाळी ७ वाजता जंगलात हजर होवून तुटपुंज्या मनुष्यबळाच्या आधारे ट्रान्झिट लाईनवर फिरणे स्वतःच्या जीवितास धोक्यात टाकण्यापलीकडे काहीही नाही. म.रा.वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मा.अजयभाऊ पाटील यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय, नागपूरचा सतत पाठपुरावा केला वन्यजीव प्रगणना कार्यक्रम जर नोव्हेंबर महिन्यात होणार असेल तर वनरक्षक व वनपालांचा जीविताची हमी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी दिल्या शिवाय माझा कोणताही वनरक्षक व वनपाल वन्यजीव प्रगणणेत सहभागी होणार नाही. असे स्पष्ट व निक्षुण वनविभाग व वन्यजीव विभागाच्या अधिकार्यांना सांगितले. व याव्दारे समस्त वनरक्षक व वनपालांना वन्यजीव प्रगणेत सहभाग न घेण्याबाबत आवाहन श्री.अजय पाटील यांनी केले आहे. प्रधान मुख्यवनसंरक्षक वन्यजीव तसेच वनबलप्रमुख यांना संघटने मार्फत सदर बाबतीत संघटने मार्फत पत्र देण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालयाने मुख्यवनसंरक्षक कार्यालयावर सदर बाबतीत ज्या ठिकाणी प्रगणना करणे शक्य असेल त्या ठिकाणी प्रगणना करणे संबंधी सुचना दिलेल्या आहेत. पंरतू महाराष्ट्रातील ११ सर्कल मध्ये वेगवेगळ्या वेळेस प्रगणना झाल्यास, चुकीची प्रगणना होईल.कारण वाघ आपली टेरिटोरी बदलत राहत असल्याने एका वेळेस प्रगणना होणे गरजेचे आहे. परंतू ३,४ सर्कल मध्ये फेब्रुवारी महिण्यात प्रगणना करण्याचे ठरविले आहे. सदर निर्णयाचे श्री. अजय भाऊ पाटील यांनी स्वागत केले आहे.पंरतू इतरही सर्कल ने जानेवारी किव्हा फेब्रुवारी महिण्यात प्रगणना केल्यास वन कर्मचार्यांसाठी सोईस्कर होईल.
तसेच जर वनाधिकाऱ्यांनी जबरदस्तीने प्रगणना करावयास लावल्या तर सर्व वनमजूर, वनरक्षक आणि वनपाल यांच्या सुरक्षतेची हमी लिखित रूपात द्यावी अन्यथा वन्यजीव प्रगणना होणार नाही अशी ठाम भुमिका महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री.अजय पाटील यांनी घेतली आहे.

Previous articleआनंदाचा शिधा नव्हे चॉकलेट..!जिल्ह्यात अनेक गावांत शिधा मिळालाच नाही; लाभार्थ्यांची दिवाळी कोरडीच..
Next articleजिरे माळी समाज संघाच्या तालुका अध्यक्षपदी मुकेश साळवे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.