Home सामाजिक संत नामदेवांच्या संत मेळाव्यातील वारकरी संत- संत चोखामेळा

संत नामदेवांच्या संत मेळाव्यातील वारकरी संत- संत चोखामेळा

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230630-WA0027.jpg

संत नामदेवांच्या संत मेळाव्यातील वारकरी संत- संत चोखामेळा

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

संत चोखोबा हे आपल्या उदरनिर्वाहासाठी पंढरपुरी येथे गेले असता. विठ्ठल भक्तीत दंग झाले ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरण व भजनात रंगून जायचे. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हरिभक्त पारायण करत असत. त्या सर्वांचे श्री विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वतः विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले. चोखोबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधण्यात आली.
*संत चोखोबांचे अभंग -*
‘धाव घाली विठू आता। चालू नको मंद। बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।’
‘जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार। बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।’
‘आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती। जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।’
‘ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।। चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।’
‘विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी।’
हे त्यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते संत चोखोबा मंगळवेढयाचे होते. त्यांना आयुष्यभर उपेक्षा मिळाली. त्यांना उपेक्षित बांधवांच्या उध्दाराची सतत काळजी वाटत होती.आपल्या बांधवांना समान हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले.

भागवत कथाकार हभप शंकरराव कोल्हे (नैताळे)
नाशिक जिल्हा अध्यक्ष- वारकरी मंच महाराष्ट्र राज्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here