Home नाशिक देव-देश-धर्मासाठी बाबा डमाळे पाटील यांच्या कार्याला साथ द्या:-ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली साळे

देव-देश-धर्मासाठी बाबा डमाळे पाटील यांच्या कार्याला साथ द्या:-ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली साळे

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20230702-WA0022.jpg

देव-देश-धर्मासाठी बाबा डमाळे पाटील यांच्या कार्याला साथ द्या:-ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली साळे

दैनिक युवा मराठा
लक्ष्मण आवारे चांदवड

छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या शिवराज्याभिषेकास ३५० वर्ष पूर्ण झाली आहेत.या निमित्ताने “हिंदू साम्राज्य दिन” बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळाचे वतीने येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघांमध्ये राबविला जात आहे.साधु-संत,विविध क्षेत्रात योगदान असणाऱ्या,विविध सांप्रदायात काम करित असणाऱ्या मान्यवरांचा व ज्येष्ठांचा शाल,श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांचे “शिवराज्याभिषेकाचा पराक्रम”ही पुस्तिका देऊन गावोगावी जाऊन सन्मान करण्यात येत आहे.
ममदापूर येथे झालेल्या कार्यक्रमात ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली साळे यांनी आपल्या वाणीतून छत्रपती शिवराय,देव-देश व धर्म,हिंदू धर्माचे संस्कार,संस्कृती,परंपरा चालीरीती यावरती चांगले व्याख्यान दिले,आपली संस्कृती परदेशी लोक अनुकरणात आणत आहेत,भारतात अनेक राजे महाराजे योद्धे, युगपुरुष, महान संत महात्मे होऊन गेलेत त्यांचा इतिहास विसरून जाणार नाही म्हणून बाबासाहेब डमाळे पाटील यांनी देव-देश-धर्मासाठी,धर्म जागृतीकरतआहेत. धर्मांतर,लव जिहाद,वशीकरण यामध्ये हिंदू मुलींना फसविले जात असून याची जनजागृती ची गरजअसुन डमाळे पाटील यांच्या उत्तम कार्याला साथ द्या,असे आवाहन साळे महाराज यांनी केले.सर्व मान्यवरांसह देविदास गुडघे यांचा वारकरी संप्रदायाच्या जिल्हा संपर्कपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सर्व धार्मिक सांप्रदायातील मान्यवर,शिवप्रेमी व हिंदू प्रेमी तसेच ममदापूर ग्रामपंचायतीचे सरपंच भिका आण्णा गुडघे,ह.भ.प. ज्ञानेश्वर(माऊली)साळे,श्रीहरी साबळे,धर्मा वैद्य,निवृत्ती बेंडके,नाना उगले, वेननाथ जाधव,देवराम वनसे,रामराव देवकर,समाधान गुडघे,जनार्दन केरे,भाऊराव केरे,बबन साळे,छबू साळे,डॉ हरिश्चंद्र राऊत,प्रविण साबळे,विजय गुडघे,दिपक गुडघे,गोरख वैद्य,संजय म्हस्के,मच्छिंद्र साबळे,हिरामण सदगिर,लक्ष्मण गिडगे, कांतीलाल साबळे,समाधान पवार,ज्ञानेश्र्वर गोराने,माधव गुडघे,वसंत गिडगे,आत्माराम साबळे,लक्ष्मण केरे, माधव उगले,मुरलीधर वैद्य,बद्रीनाथ वैद्य,कचरू बतासे,त्र्यंबक अहिरे,माधव सिरसाठ,नाना भोसले,साहेबराव देवकर,नंदु भोकरे,बाळू म्हस्के,ज्ञानेश्वर वैद्य,निवृत्ती सिरसाठ,अभिषेक कुलकर्णी,सोपान शिंदे,गुलाबराव उगले, अशोक बनसोडे,नारायण केरे,अरूण केरे,महेश केरे, भरतदास बैरागी,निवृत्ती वैद्य,त्र्यंबक शिंदे,विजय केरे,दत्तु काळे,बाळू भोसले,पांडुरंग सदगीर,राजू सिरसाठ,राजू वाघ,वामन अहिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन गोरख वैद्य यांनी केले.

@ निफाड तालुक्यातील लासलगाव-देवगाव-विंचूर परिसरानंतर येवला तालुक्यातील पूर्व भागातील देवदरी,खरवंडी,आड सुरेगाव,भुलेगाव,भारम,डोंगरगाव,सुरेगाव,देवळणे,दुगलगाव आदी गावांना बाबासाहेब डमाळे मित्र मंडळाचे वतीने छत्रपतींचा ३५० वर्ष राज्याभिषेक पूर्ण झाल्याबद्दल हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्यात आला.ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले.साधू-संत व ज्येष्ठ नागरिक, वेगवेगळ्या सांप्रदायातील मान्यवरांचा सन्मान डमाळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावागावात मोठ्या संख्येने शिवप्रेमी व हिंदू प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून डमाळे पाटील यांना प्रतिसाद देत आहे.

Previous articleसंत नामदेवांच्या संत मेळाव्यातील वारकरी संत- संत चोखामेळा
Next articleलासलगाव येथील मैत्री ग्रुप व ब्राह्मण महासंघ मैत्रेयी मंडळ यांच्यावतीने भक्तीमय वातावरणात भजन संध्या संपन्न–
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here