Home माझं गाव माझं गा-हाणं सटाणा नगरपालिकेचा अनोखा गणपती मुर्ती विसर्जन कार्यक्रम

सटाणा नगरपालिकेचा अनोखा गणपती मुर्ती विसर्जन कार्यक्रम

119
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा (शशिकांत पवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

सटाणा नगरपालिकेने गणपती मूर्ती विसर्जन हा कार्यक्रम राबवला असून सटाणा शहरात एकूण आठ ठिकाणी या गणपती मूर्तींचे संकलन करून विधिवतपणें गणपती विसर्जन कार्यक्रम हाती घेतला. गणपती विसर्जनात गणपतीच्या मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून तसेच पर्यावरण पूरक घटकांची काळजीपोटी नदीमध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी हा एक अभिनव उपक्रम सुरु केला असून याला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे . तर त्याला रोटरी क्लब ऑफ सटाणा या सारख्या समाजसेवीसंस्थांनी देखील नगरपालिके सोबत या कार्यक्रमास सहकार्य केले आहे .
शहरातील मूर्ती विसर्जन करण्यासाठी शहरातील आठ ठिकाणी अशी गणपती मूर्ती विसर्जन संकलन केंद्र उभी केली असून या माध्यमातून एका मोठ्या टाकीत गणपतीला विसर्जित करून ती गणपती मूर्ती संकलित कधी जाते तसेच हार , पुषपगुच्छ वगैरेसारखे निर्माल्य , निर्माल्य कलश मध्ये साठवण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी टळली आहे.

” *गणपती विसर्जन वेळी मोठया गर्दी होते त्याचप्रमाणे गणपती विसर्जन करताना अनेक अप्रिय घटना घडतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्माल्य व गणेश मूर्तींचे विसर्जन नदी नाल्यांमध्ये केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते ते टाळण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आम्ही हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.”*
*सुनिल मोरे , लोकनियुक्त नगराध्यक्ष सटाणा नगर पालिका*

Previous articleसोमय्यांवरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही – संजय राऊत
Next articleस्मार्ट विलेज ‘ नवे निरपुर ला पर्यावरण घटकांचे रक्षण करत एकाच ठिकाणी अनोखे गणपती मूर्ती विसर्जन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here