Home माझं गाव माझं गा-हाणं स्मार्ट विलेज ‘ नवे निरपुर ला पर्यावरण घटकांचे रक्षण करत एकाच ठिकाणी...

स्मार्ट विलेज ‘ नवे निरपुर ला पर्यावरण घटकांचे रक्षण करत एकाच ठिकाणी अनोखे गणपती मूर्ती विसर्जन.

97
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा-(शशिकांत पवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

आदर्शगाव ,स्मार्ट व्हिलेज ,तंटामुक्त गाव, निर्मल ग्राम असे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असलेले गाव म्हणून नवे निरपूर या गावाची वेगळी ओळख असून या गावात नेहमी इतर गावानंपेक्षा वेगळच’ जरा हटके ‘कार्य करीत इतर गावांपुढे आदर्श निर्माण करत असत.
त्याप्रमाणे या वर्षी माझी वसुंधरा अभियानात ग्रामस्थ ,ग्रामपंचायत यांनी पर्यावरणाची व नैसर्गिक घटकांची संरक्षण व सुरक्षितता करण्याची ,रक्षण करण्याची शपथ घेतली आहे त्यानुसार यावर्षी ग्रामपंचायत ने गावातील सर्व गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या समोर कृतीम कुंड तयार करून त्या कुंडात गणपती मूर्तींचे विसर्जन केले व निर्माल्य देखील एका ठिकाणी जमा करून निर्माल्यची योग्य विल्हेवाट लावून पर्यावरण पूरक घटकांची हानी होणार नाही याची दक्षता घेऊन हे एकत्र संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्याचे ठरवले आहे त्यामुळे असा उपक्रम करत नवे निरपूर ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा अभियानात ‘घेतली शपथ घेतलेली शपथ सार्थ ठरवत इतर गावानंपुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे गावाच्या या अनोख्या वअभिनव उपक्रमाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. हा उपक्रम यशस्वीतेसाठी सरपंच मुन्ना सूर्यवंशी माजी सरपंच भाऊसाहेब, सामाजिक कार्यकर्ते निलेश सूर्यवंशी, उपसरपंच ,सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी नंदू सूर्यवंशी शिवाजी शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleसटाणा नगरपालिकेचा अनोखा गणपती मुर्ती विसर्जन कार्यक्रम
Next articleसौंदाणेच्या शिवमहाराष्ट्रचे किशोर पवार यांचा आगळा वेगळा नाविण्यपुर्ण उपक्रम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here