Home माझं गाव माझं गा-हाणं सौंदाणेच्या शिवमहाराष्ट्रचे किशोर पवार यांचा आगळा वेगळा नाविण्यपुर्ण उपक्रम

सौंदाणेच्या शिवमहाराष्ट्रचे किशोर पवार यांचा आगळा वेगळा नाविण्यपुर्ण उपक्रम

79
0

राजेंद्र पाटील राऊत

देवाचे देवपण जपू या…!
पर्यावरणाचे रक्षण करु या…!!
सौंदाणेच्या शिवमहाराष्ट्रचे किशोर पवार
यांचा आगळा वेगळा नाविण्यपुर्ण उपक्रम
सौंदाणे,(काकासाहेब सांळुखे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
अनंत चतुर्दशी या दिवशी गणपती विसर्जन करत आसतो. पण दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी गणपती विसर्जन न करता व पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम व देवाचे देवपण लक्षात घेता. समाज जनजागृती सुंदर संदेश देत शिव महाराष्ट्र परिवार-लोकचळवळ व सौदाणे परिसर वाचनालय यांनी गेल्या 13 वर्षापासून सुरू असलेल्या उपक्रम गणपती मुर्ती संकलन करणे व्यवस्थापन व पुनर्वापर या निमित्ताने दिलेला संदेश. तसेच पर्यावरणाचे नुकसान जिवित व वित हानी वाहतुकीस समस्या पोलिस सुरक्षा यंत्रणेवरील अधिक जबाबदारी इत्यादी विषयी जनजागृती मार्गदर्शन वर्षभर चालू असते या कार्यासाठी सौंदाणे पंचकोशितील व उमराणे, मालेगाव नेहरूनगर , शिरसोंडी व-हळे ,सावकारवाडी तसेच ता.देवळा मालेगाव सटाणा तेथील गणेश भक्तताचे व पर्यावरण प्रेमिची मदत लाभते तसेच या ठिकाना हून गणपती मुर्ती संकलना साठी शिव महाराष्ट्र केंद्र – सौंदाणे येथे मुर्ती दान करण्यासाठी कार्यकर्त्यांसह अनेक पंचकोशीतील ग्रामस्थ मान्यवरानी संकलन केंद्रात भेट देत तसेच मंडळाच्या व इतर लहान मोठया एकूण 225 मुर्तीचे संकलन केले.
तसेच काही गणेशभक्तनी पंचकोशील गावातील गणपती मुर्तीचे संकलन करुन शिव महाराष्ट्र परिवार संकलन केन्द्रात जमा करुन. शिव महाराष्ट्र परिवारचे कार्य समजून घेऊन कार्यास धन्यवाद देतात.
या कार्यासाठी शिव महाराष्ट्र परिवाराचे स्वंस्थापक अध्यक्ष – किशोर पवार, संकलन प्रमुख जनार्दन पवार, सुकदेव पवार, शरद पवार मुख्याध्यापक विवेक कापड़णिस, ,प्रशांत पवार , पराग पवार, स्वाती शेवाळे, सरोज नवले संगिता बच्छाव आदिच्या नेतृत्वाखाली गणपती मुर्ती संकलन व पर्यावरण जनजागृति अभियान मार्गदर्शन कार्य अविरत चालू ठेवण्याचा संकल्प केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here