Home पुणे दुधाने परिवाराचे कर्वेनगरच् व पुणे शहरच्या विकासासाठी प्रथम प्राधान्य, पुलासाठी दिली १२...

दुधाने परिवाराचे कर्वेनगरच् व पुणे शहरच्या विकासासाठी प्रथम प्राधान्य, पुलासाठी दिली १२ गुंठे जागा

71
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 दुधाने परिवाराचे कर्वेनगरच् व पुणे शहरच्या विकासासाठी प्रथम प्राधान्य, पुलासाठी दिली १२ गुंठे जागा 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕शहरातील मुख्य वसाहत असलेल्या कर्वेनगर व सनसिटी सिहंगड रोडला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर दुधाने परिवार यांच्या तत्परतेमुळे मार्गी लागला आहे. या पुलासाठी लागणारी तब्बल १२ गुंठे जागा आज मनपाला प्राथमिक ताबेयादी करुण पुढील प्रक्रिया करण्याकरिता परवानगी दिली. पुणे मनपा शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि दुधाने परिवार यांची आज मनपा कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत दुधाने परिवाराने पुन्हा एकदा कर्वेनगरच्या विकासाला प्रथम प्रधान्य देत जमीन देण्याचा निर्णय घेतला.

दुधाने परिवाराची यापुर्वी शिवणे ते खराडी या डीपी रोडकरिता कर्वेनगर मधीलच स्वता:च्या मालकीची (३० मीटर व १२ मीटर डीपी रस्त्यासाठी) ४ एकर जागा पुणे महापालिकेला त्यांनी दिली आहे व जागेवर रस्ताही पुर्ण झाला आहे. तसेच दुधाने परिवाराच्या इतर जागेत पुणे महापालिकेने आतापर्यंत प्रायमरी स्कुलसाठी ४० गुंठे, लायब्ररीसाठी ८ गुंठे, हॉस्पिटलसाठी १२ गुंठे, ग्रीन बेल्टसाठी ८५ गुंठे आरक्षण टाकले आहे. अगोदर एवढी जमीन जाऊनही परत आता कर्वेनगर ते सनसिटी-सिंहगड रोड परिसराला जोडणाऱ्या पुलासाठी जागा दुधाने परिवाराने दिली आहे.

कर्वेनगर ते सनसिटी-सिंहगड रोड ते या दोन्ही उपनगरांना येण्या-जाण्यासाठी अर्धा तासाचा कालावधी लागत आहे, तो या नदीवरील पुलामुळे पाच मिनिटाच्या कालावधीमध्ये जाणे-येणे होईल, इतकी जवळ ही दोन्ही उपनगरे जोडली जाणार आहेत. तसेच कर्वेनगर व सिंहगड रोड-सनसिटी परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍नही सुटेल.

यावेळी दुधाने परिवारातील कुटुंब प्रमुख मा कोंडीराम दुधाने, मा.माणिकशेठ दुधाने, मा. विजय दुधाने, मा स्वप्निल दुधाने उपस्थित होते ⭕

Previous articleसौंदाणेच्या शिवमहाराष्ट्रचे किशोर पवार यांचा आगळा वेगळा नाविण्यपुर्ण उपक्रम
Next articleअश्लील चित्रपट प्रकरणी अटक झालेल्या राज कुंद्रा आणि रायन थोरपे दोघांना जामिन मंजूर 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here