Home बुलढाणा गावातील नालीमुळे डासांचा उपद्रव वाढल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात तात्काळ नालीचे बांधकाम करण्याची...

गावातील नालीमुळे डासांचा उपद्रव वाढल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात तात्काळ नालीचे बांधकाम करण्याची गावकऱ्यांची मागणी

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20220728-WA0013.jpg

गावातील नालीमुळे डासांचा उपद्रव वाढल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात

तात्काळ नालीचे बांधकाम करण्याची गावकऱ्यांची मागणी

युवा मराठा न्युज वेब पोर्टल
प्रतिनिधी:- रवि शिरस्कार,संग्रामपुर

तालुक्यातील वरवर खंडेराव वार्ड
क्र. २ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील नाली बांधकाम ३० जुलैपर्यंत सुरू करण्यात यावे अन्यथा १ ऑगस्ट रोजी पं.स. कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा गटविकास अधिकारी यांना एका निवेदनाव्दारे देण्यात आला.

निवेदनात नमूद केले आहे की, वार्ड क्र. २ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोरील नाली बंद झाल्यामुळे घाण पाणी पुतळया समोर साचत आहे. तसेच डासांचा उपद्रव वाढल्याने परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुलांना शाळेत जाण्याकरीता अडचण निर्माण होत आहे. तसेच सर्व गावातील नागरीकांना त्या रस्त्याने जाण्यास त्रास होत

आहे. सरपंच आणि सदस्य यांना वेळोवेळी तोंडी तक्रार करुनही त्यांनी आजपर्यंत तक्रारीची दखल घेतली नाही. ग्रामसेवक एक-एक महिना गावात येत नाही आणि आम्ही स्वतःहुन काम करायला सुरूवात केली तर ग्रामसेवक वेळेवर बिल काढत नाही. असे ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तरी सदर तक्रारीची दखल घेवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

पुतळया समोरील नालीचे बांधकाम ३० जुलैपर्यंत चालु करण्यात यावे. अन्यथा १ ऑगस्ट रोजी पं.स. कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर धम्मपाल तायडे, शे. मोहिन शे. अयुब, विकास भारसाळे, गोपाल ईटवार, शे. इमरान शे. कमरूद्दीन, शे. अजहर शे. गुलाब, धम्मसागर तायडे यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here