Home बुलढाणा अपुऱ्या वर्ग खोल्यामुळे शिक्षकांना दोन सत्रात चालावी लागते शाळा.. युवा स्वाभिमानी पार्टी...

अपुऱ्या वर्ग खोल्यामुळे शिक्षकांना दोन सत्रात चालावी लागते शाळा.. युवा स्वाभिमानी पार्टी बुलढाणा ची टूनकी येथे जिल्हापरिषद शाळेवर धडक

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220728-WA0006.jpg

अपुऱ्या वर्ग खोल्यामुळे शिक्षकांना दोन सत्रात चालावी लागते शाळा..
युवा स्वाभिमानी पार्टी बुलढाणा ची टूनकी येथे जिल्हापरिषद शाळेवर धडक

शेकडो शाळकरी मुलांकरिता मूठभर शिक्षकांची तारेची कसरत..

युवा मराठा न्युज वेब पोर्टल
प्रतिनिधी -रवि शिरस्कार,संग्रामपूर

संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळा टुनकी येथील मुलांच्या पटसंख्या नुसार शिक्षक उपलब्ध नसुन बरीच पदे रिक्त आहेत .
तसेच मुलांच्या पट संख्येप्रमाणे शिकवणी करता खोल्या सुद्धा उपलब्ध नाहीत.यामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आहे अशी तक्रार टूनकी येथील पालक वर्गाकडुन होत आहे.

दिनांक २६ जुलै रोजी युवा स्वाभिमानी पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राजपाल वानखडे, संग्रामपूर अध्यक्ष प्रभुदास पारस्कर,सहसचिव निखिल चौधरी तसेच संग्रामपूर तालुक्यातील पार्टीचे पदाधिकारी यांनी गावातील काही पालक वर्ग यांच्या सह शाळेला भेट दिली.
या शाळेत मुलांची एकूण ४०२ पट संख्या असुन एकूण १ते ७ वर्ग आहेत त्यामध्ये एकुण १३ तुकड्या आहेत.

मागील वर्षी शाळेमध्ये १४ शिक्षक उपलब्ध होते. त्यानंतर बदली मुळे, सेवा निवृत्ती यामुळे ५ शिक्षक कमी झाले आहेत.
शाळे मधील काही खोल्या शिकस्त झाल्यामुळे मागील २ वर्षांपासून कुलूपबंद अवस्थेत त्या पडुन आहेत. या शाळेत मुख्याध्यापक पद रिक्त असुन १ पदवीधर,२ सहायक अशी ४ पदे रिक्त आहेत.
पट संख्येच्या आधारावर शाळेमध्ये खोल्या मुबलक प्रमाणात नसल्याने नाईलाजाने शिक्षकांना शाळेचा नियमित वेळ १० ते५ हा बदलवून शाळा २ सत्रा मध्ये घ्यावी लागत आहे.

एक शिक्षक दोन तुकड्यां सांभाळत मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे.
हे काम शिक्षका करिता तारेवरची कसरत असली तरी विद्यार्थ्यांची भवितव्य सुद्धा तेवढेच धोक्यात आहे एवढे मात्र निश्चित.

रिक्त पदांची,खोलीची अडचन या बाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी पाठवण्यात येतो तरी पण वरिष्ठ अधिकारी या गंभीर विषयाकडे लक्ष का देत नाही याबाबत पालक वर्ग चिंतेत आहे.
शाळेतील रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरून शिकस्त खोल्यांचे नवीनीकरन करावे
व मुलांच्या शैक्षणिक भवितव्याला नव संजीवनी देण्याचे काम करावे अशी मागणी गावातील सर्व पालक वर्गांकडून होत आहे.

Previous articleगावातील नालीमुळे डासांचा उपद्रव वाढल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात तात्काळ नालीचे बांधकाम करण्याची गावकऱ्यांची मागणी
Next articleस्वप्नांना सत्यात उतरवण्याआधी त्यांना व्यवस्थित पहावे लागते….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here