Home नाशिक लासलगाव येथील मैत्री ग्रुप व ब्राह्मण महासंघ मैत्रेयी मंडळ यांच्यावतीने भक्तीमय वातावरणात...

लासलगाव येथील मैत्री ग्रुप व ब्राह्मण महासंघ मैत्रेयी मंडळ यांच्यावतीने भक्तीमय वातावरणात भजन संध्या संपन्न–

186
0

आशाताई बच्छाव

IMG-20230701-WA0083.jpg

लासलगाव येथील मैत्री ग्रुप व ब्राह्मण महासंघ मैत्रेयी मंडळ यांच्यावतीने भक्तीमय वातावरणात भजन संध्या संपन्न–

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यासमोर येतो वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर. टाळ- मृदुंगांचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुका सह पायी चालणारी दिंडी. वर्षांनुवर्ष चाललेली धार्मिक परंपरा धर्म संस्कृती परंपरेचा एक अद्भुत सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी. विठ्ठल नामी रंगण्याचा दिवस. विठ्ठल नामी रंगत असताना भान सामाजिक बांधिलकीचे प्रयत्न आरोग्य हीत जपण्याचे मैत्री ग्रुप च्या माध्यमातून लासलगाव तसेच परिसरात नेहमीच सामाजिक धार्मिक उपक्रम राबविण्यात येत असतात. मागील महिन्यात आरोग्य संवर्धन उपक्रमा अंतर्गत महिलांचे मानसिक शारीरिक आरोग्य कार्यक्रम घेण्यात आला. आज धार्मिक ते सह भविष्यातील आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारची योजना आयुष्यमान भारत (आभा)कर्ड आज मैत्री ग्रुपच्या माध्यमातून नोंदवण्यात आली. PHC प्रमुख डॉ अविनाश जी पाटील, आशा वर्कर अर्चना सोनवणे, भाग्यश्री भागवत, भाजपा लासलगाव मंडल अध्यक्ष महिला मोर्चा स्मिताताई कुलकर्णी, युवा शहराध्यक्ष निलेश जगताप, सचिव पियुष बंब यांच्या मार्गदर्शन सहकार्याने आभा नोंदणी करण्यात आली. हे काम एक दिवसाचे नसून पुढील शनिवारी दुपारी दोन ते चार यावेळी पुन्हा ग्रामपंचायत हॉल किल्ला मागे अहिल्यादेवी चौक येथे नोंदणी करण्यात येणार असून इच्छुकांनी उपस्थित रहावे असे देखील आवाहन करण्यात आले. तसेच या सामाजिक हित कार्यक्रमानंतर मैत्री ग्रुप लासलगाव ब्राह्मण महासंघ मैत्रेयी मंडळ यांच्या वतीने भक्तिमय वातावरणात भजन संध्या साजरी करण्यात आली. मैत्री ग्रुपच्या भजन प्रमुख आरती ताई सोनवणे, ब्राह्मण महासंघ विश्वस्त तसेच मैत्री ग्रुप प्रमुख स्मिताताई कुलकर्णी, मैत्री ग्रुपच्या अनिताताई जाधव, ब्राह्मण महासंघ नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अक्षदा जोशी, संगीता भागवत, इंदुबाई पवार, मंगल शिरसाठ यांच्या नेतृत्वाने मैत्री ग्रुपच्या शैला सोनवणे, सोनाली कर्डिले, अर्चना सोनवणे, कविता चव्हाण, रजनी कुलकर्णी ,सीमा देशमुख ,मैत्रेयी महिला मंडळ च्या सुजाता भंडारी यांच्या मार्गदर्शनाने भारती इंगळे, बेबीताई आहेर ,माया डुंबरें, विद्या डुंबरे ,निर्मला जाधव, रेखा रायजादे ,अनिता कहाणे, शोभा इंगळे, सुमन ताई ,सरला कहाणे ,मनीषा लुटे, संजीवनी सोनवणे, सुनीता जोशी, मीना वझरे, हौशाबाई निकम, यशोदाबाई खैरे ,तृप्ती केंगे यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत हॉल किल्ल्यामागे अहिल्यादेवी चौक लासलगाव येथे भजन संध्या कार्यक्रम पार पडला.

Previous articleदेव-देश-धर्मासाठी बाबा डमाळे पाटील यांच्या कार्याला साथ द्या:-ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली साळे
Next articleजिल्हा परिषद च्या बांधकाम विभागात फाटा फूट, विभाजनाचा प्रस्ताव.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here