Home अमरावती जिल्हा परिषद च्या बांधकाम विभागात फाटा फूट, विभाजनाचा प्रस्ताव.

जिल्हा परिषद च्या बांधकाम विभागात फाटा फूट, विभाजनाचा प्रस्ताव.

152

आशाताई बच्छाव

Screenshot_20230702-174807_WhatsApp.jpg

जिल्हा परिषद च्या बांधकाम विभागात फाटा फूट, विभाजनाचा प्रस्ताव.
दैनिक युवा मराठा वृत्त संकलन.
पी.एन. देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.
जिल्हा परिषद च्या बांधकाम विभागाचे विभाजन करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवाकडे सादर केला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळतात आगामी काळात झेड दोन विभाग अस्तित्वात येणार आहे. परिणामी कार्यकारी अभियंता यांच्याकडील १४ तालुक्याचा असलेला भार निम्म्यापेक्षा कमी होणार आहे. याशिवाय दोन कार्यकारी अभियंता ग्रामविकास यांच्या कामाच्या सांभातील जिल्ह्यात १४ तालुक्यातून भौगोलिक क्षेत्रफळ १२२३५ वर्ग किलोमीटर आहे. झेडपीचे ७ उपविभाग आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एका तालुक्यासाठी एक उपविभाग, चार विभागासाठी १ विभागीय कार्यालय आणि ४ विभागासाठी एक मंडळ कार्यालयाशी सरांचना अस्तित्वात आहे. याशिवाय या विभागाकडे राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग मीळुन३७३०.८० रस्ते देखभाल दुरुस्ती करता आहेत. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे १४ उपविभाग असून ४ विभागीय कार्यालय आहे. या उलट झेडपीबांधकाम विभागाकडे इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाची एकूण ७४२९.५४ किलोमीटरची लांबी देखील दुरुस्ती करता असून एवढ्या मोठ्या लांबी ची देखभाल दुरुस्तीसाठी७ उपविभाग व एकच विभाग आहे. यासोबतच शासनाच्या विविध योजनांची हजारे कामे झेडपी बांधकामाकडे आहेत.
त्यामुळे एवढा मोठा कामावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे झेडपीत १ तालुक्यात १ उपविभाग असावा ७ उपविभागाचा केवळ एक कार्यकारी अभियंताकडे आहे. त्यामुळे आणखीन एक कार्यकारी अभियंता पद निर्माण करणे आवश्यक आहे. नदीच्या यवतमाळ झेडपी सुद्धा झेडपी बांधकाम विभाग क्रमांक एक आणि दोन असे दोन विभाग अस्तित्वात आहे आता नवे डिव्हिजन अचलपूरला होणार. झेडपी बांधकाम विभागाचे दोन विभाग अस्तित्वात आल्यानंतर दुसरे डिव्हिजन कार्यालय हे अचलपूर किंवा मुख्यालयात राहणार आहे. यात अचलपूर विभागात सहा तालुक्याचा कारभार राहील.यात चिखलदरा, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, आणि दर्यापूर तालुक्याचा समावेश असेल. उर्वरित ८ तालुके अमरावती विभागात समाविष्ट असतील. झेडपी बांधकाम विभागाचे दोन डिव्हिजनचा प्रस्ताव सीईओ, ॲडिशनल सी ईओ यांच्या मार्गदर्शनात बांधकाम विभागाने तयार करून तो स्वाक्षरीने शासनाकडे सादर केला आहे याला मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. मान्यता मिळतात यापुढे झेडपी दोन डीविजन अस्तित्वात येतील दिनेश गायकवाड कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, झेडपी यांनी माहिती दिली.