Home पुणे पुणे जिल्ह्यातील खामगाव शाळेत डाँक्टर दिनानिमित युवा मराठा न्युजने आयोजीत केली कार्यशाळा

पुणे जिल्ह्यातील खामगाव शाळेत डाँक्टर दिनानिमित युवा मराठा न्युजने आयोजीत केली कार्यशाळा

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20230702-WA0020.jpg

दैनिक युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा ब्युरो चीफ श्री प्रशांत नागणे                                               न्यू इंग्लिश स्कूल खामगाव या ठिकाणी सुजान पालकत्व या विषयावर कार्यशाळा- डॉक्टर संतोष मचाले, न्यू इंग्लिश स्कूल खामगाव या ठिकाणी आदर्श पालकत्व या विषयावर कार्यशाळा- समाप्त झाली. या कार्यशाळेस 300 हून अधिक पालक वर्ग उपस्थित राहिले होते. ही कार्यशाळा युवा मराठा न्यूज च्या माध्यमातून मोफत लावण्यात आली होती. समाजामध्ये आपण राहत असताना समाजासाठी आपले काहीतरी देणे लागते, म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही कार्यशाळा घेतली गेली होती. हे कार्यशाळा सनक्रिस्टल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संतोष मचाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली समाप्त झाले, डॉक्टर संतोष मचाले यांना 25 पेक्षा जास्त पुरस्काराने सन्मानित केले गेलेले आहे. त्यांचे स्पेशलिझेशन पेरेंट कौन्सलिंग मध्ये झालेले आहे. यांनी आजवर पाच लाख प्लस विद्यार्थी पालकांचे कौन्सलिंग केलेले आहे, त्याचबरोबर साडे सहाशे प्लस पालकांच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्यांनी खामगाव येथील कार्यशाळेत बोलताना सांगितले की आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजन नागरिक आहेत यांच्याच हातामध्ये भारताचे भविष्य अवलंबून आहे. यांचे शिक्षण चालू असताना पालक वर्गाचे तसेच शिक्षकाच्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांनी ते सांगितले आज आपल्या मुलांचे ॲडमिशन झाले की, पालक वर्ग त्या जबाबदाऱ्यातून मुक्त होतात, परंतु ज्याप्रमाणे शिक्षक जबाबदारीने शिकवतात, त्याचप्रमाणे पालकांची ही जबाबदारी वाढलेली असते याची जाणीव मचाले सरांनी पालकांना करून दिली विद्यार्थी शिक्षण घेत असताना पालकांनी त्यांच्यावर प्रेशर न करता त्यांच्यातील कॉलिटी ओळखून त्यांना शिक्षणासाठी सपोर्ट करावा असे त्यांनी सांगितले. आज मुलांचे आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे मुलांचे टीव्ही मोबाईल पाहण्याचे प्रमाण वाढलेले आहे, यावर पालकांना नियंत्रण कसे करता येईल याचे मार्गदर्शन सरांनी केले. त्याचबरोबर आज कमी वयातल्या मुलींना लहू जिहाद सारख्या संघटना त्यांच्या गळाला लावून त्यांची फसवणूक करून त्यांना पळून नेत आहेत, आणि त्यांच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार करत आहेत तर यासाठी पालकांची जबाबदारी काय याबद्दल सरांनी खूप छान मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तसेच सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता तसेच, दैनिक युवा मराठा न्यूज चे पुणे जिल्हा ब्युरो चीफ, श्री प्रशांत नागणे हे ही उपस्थित होते संस्थेकडून सर्वांचा सत्कार करण्यात आला, आणि डॉक्टर संतोष मचाले यांचे आभार व्यक्त करून कार्यशाळेची समाप्ती करण्यात आली.

Previous articleजिल्हा परिषद च्या बांधकाम विभागात फाटा फूट, विभाजनाचा प्रस्ताव.
Next articleके.पी.बी.सी क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरू पौर्णिमा निमित्त , क्रीडा गुरूंचा चा सन्मान घेण्यात आला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here