Home जळगाव जिल्हाधिकारी जळगाव यांचे हस्ते ‘किमया गृपचा ‘ यथोचित सन्मान

जिल्हाधिकारी जळगाव यांचे हस्ते ‘किमया गृपचा ‘ यथोचित सन्मान

118

आशाताई बच्छाव

IMG_20231218_070803.jpg

जिल्हाधिकारी जळगाव यांचे हस्ते ‘किमया गृपचा ‘ यथोचित सन्मान
चाळीसगाव, प्रतिनिधी विजय पाटील……..…………………………………..
निसर्गा प्रतिचे वैचारिक स्पंदन म्हणजे “किमया गृप “.नगर परिषद चाळीसगाव तफै पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारी संस्था -” किमया गृप ” चा सन्मान जळगाव जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद यांनी केला .किमया गृपचे पदाधिकारी पर्यावरण मित्र शालिग्राम निकम व कोमलसिंग जाधव यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले . यावेळी प्रांताधिकारी श्री प्रमोद हिले साहेब , मुख्य अधिकारी श्री ठोंबरे साहेब , नायब तहसिलदार जितेंद्र धनराळे,आरोग्य व पर्यावरण अधिकारी निकम साहेब उपस्थित होते .चाळीसगाव शहर व पंचक्रोशीतत जवळपास ३००० झाडे लावणे, त्यांचे संगोपन व संवर्धन करणे , वृक्षारोपण संबधी प्रचार व प्रसार करणे , देशी वृक्षाचे वाटप करणे , राष्ट्रीय सण , वसुंधरा दिन , जागतिक पर्यावरण दिन , जल दिन, वन्य व पर्यावरण सप्ताह साजरा करणे , वृक्षदिंडी काढणे , पर्यावरण साहित्य प्रदर्शन भरविणे , वाढदिवसाला वृक्ष भेट देणे , दशक्रिया विधीला वृक्षदान करणे अशी कामे लोकसहभागातून करून अल्पावधीच ‘किमया गृप ‘संस्था नावारूपाला आली . त्यासाठी वृक्षमित्र आप्पा भालेराव , प्रा.राजेंद्रसिंग पाटील, आबासाहेब कच्छवा, शांताराम पाटील व इतर पदाधिकारी करीत आहे .
या गौरवामुळे किमया गृप ला आधिक काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे .

Previous articleचाळीसगाव येथे बनावट कागदपत्रे बनवून प्लॉट ची परस्पर विक्री – 6 जणांवर गुन्हा
Next articleअखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनाध्यक्षपदी खांदेशच्या डॉ सौ साधना निकम यांची सार्थ निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.