Home जळगाव चाळीसगाव येथे बनावट कागदपत्रे बनवून प्लॉट ची परस्पर विक्री – 6 जणांवर...

चाळीसगाव येथे बनावट कागदपत्रे बनवून प्लॉट ची परस्पर विक्री – 6 जणांवर गुन्हा

64
0

आशाताई बच्छाव

IMG_20231218_070128.jpg

चाळीसगाव येथे बनावट कागदपत्रे बनवून प्लॉट ची परस्पर विक्री – 6 जणांवर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- महिलेने बनावट कागदपत्रे सादर करून मध्य प्रदेशच्या महिलेचा प्लॉट परस्पर विक्री केल्या प्रकरणी 6 जणांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की सौ कल्पना चंद्रमोहन तिवारी 58 सुभाष वार्ड बुंदेलखंड मोहल्ला बरेली जि रायसेन मध्यप्रदेश यांचा चाळीसगाव नगर पालीका हद्दी बाहेरील करगाव रोडलगत सर्वे नं.418/2+4ब/1 अ 2+1अ + 1 ब यातील प्लॉट नं. 40 ज्याचे एकुण क्षेत्रफळ 237.50 चौ.मी. हा बिगरशेती प्लॉट आहे.
कल्पना तिवारी यांचे चाळीसगाव माहेर असून त्यांचे चुलत भाऊ हनुमानवाडी चाळीसगाव येथे राहतात त्यांचे चाळीसगाव येथे येणे जाणे असते. 1 महिन्यापूर्वी त्यांच्या सांगण्यावरून त्यांचा चुलत भाऊ प्लॉटचा उतारा काढण्यासाठी गेल्यावर उताऱ्यावर दुसरी नावे दिसल्याने त्यांनी चाळीसगाव येथे येवून चौकशी केली असता
त्यांच्या नावे बनावट कागदपत्रे करून
दि. 22/01/2014 रोजी 5-27 ते 5-36 वाजेदरम्यान सह दुय्यम निबंधक कार्यालय चाळीसगाव याठिकाणी लिहुन घेणार गणेश भाऊसाहेब देशमुख रा. देशमुख गल्ली चाळीसगाव याने लिहुन देणार बनावट महिला नामे कल्पना चंद्रमोहन तिवारी रा. हिरापुर ता. चाळीसगाव हिस बनावट मतदान कार्डाचा वापर करुन
दुय्यम निबंधक कार्यालय चाळीसगाव याठिकाणी हजर करुन साक्षीदार प्रशांत विजयकुमार भोसले (पत्ता माहित नाही), समाधान विक्रम ठुबे (पत्ता माहित नाही), ओळख देणार वाल्मिक ओंकार मराठे रा. चाळीसगाव व नारायण शामराव चव्हाण रा. चाळीसगाव यांचे मदतीने आपसात संगनमत करुन कट रचुन
2.33,000/- रुपये मध्ये बनावट खरेदी खत दस्त क्रमांक 541/2014 असा नोंदणी करुन प्लॉट स्वतःचे नावे करुन त्यानंतर इतर लोकांना विक्री करुन त्यांची फसवणुक केल्याचे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे याप्रकरणी वरील 6 जणांवर
कलम 420, 465,
467, 468, 471, 34, 120-B प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleभाजपाची घनसावंगी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर
Next articleजिल्हाधिकारी जळगाव यांचे हस्ते ‘किमया गृपचा ‘ यथोचित सन्मान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here